सुधाकर रोकडे यांनी ३० वर्षे अंत्यत शिस्तीत,प्रमाणिकपणे आणि विनातक्रार सेवा दिली – माजी आ.भीमसेन धोंडे

25

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.30जून):-१९९१ साली आष्टीत विनाअनुदानीत भगवान महाविद्यालय सुरु केले होते.प्रतिकुल परिस्थितीत प्राध्यापक,कर्मचाऱ्यांनी आपला सेवाकाल विना पगाराचा व्यथीत केला.त्यांच्या निष्ठेला व चिकाटीला फळ मिळाले.सुधाकर रोकडे या वरिष्ठ लिपीकाने आपला ३० वर्षाचा सेवाकाल अंत्यत चांगला,विनातक्रार घातला आहे.आपण कोणत्याही संस्थेत,कंपनीत काम करीत असा त्या संस्थेशी निष्ठा ठेवा.प्रामाणिक राहा निश्चितच आनंद मिळेल असे सांगत सुधाकर रोकडे यांनी अंत्यत शिस्तीत,प्रमाणिकपणे आणि विनातक्रार सेवा दिली असल्याचे प्रतिपादन शेतकरी शिक्षण संस्थेचे संस्थाध्यक्ष माजी आ.भीमसेन धोंडे यांनी केले.

आष्टी येथील भगवान महाविद्यालयातील वरिष्ठ लिपीक सुधाकर रोकडे यांच्या सेवापूर्ती सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन जेष्ठ संचालक विठ्ठलआण्णा बन्सोडे,पत्रकार उत्तम बोडखे,लक्ष्मण रेडेकर,प्राचार्य डाॕ.दत्तात्रय वाघ हे उपस्थित होते.यावेळी प्रा.डाॕ.आप्पासाहेब टाळके,प्रा.नामदेव वाघुले,प्रा.राजु पाचे,प्रा.श्रीकांत धोंडे,पं.नेहरु कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य भाऊसाहेब ढोबळे,पत्रकार उत्तम बोडखे,प्राचार्य डाॕ.दत्तात्रय वाघ यांची भाषणे झाली.
यावेळी मार्गदर्शन करताना माजी आ.धोंडे म्हणाले की,सुधाकर निवृत्तीराव रोकडे १९९२ पासून भगवान कॉलेजमध्ये कार्यरत आहेत.

३० वर्षाच्या सेवेमध्ये कुठलाही कलंक नाही.कार्यक्षम व्यक्ती आहे.वक्तशीरपणा,टापटीपपणा,चांगले राहणीमान,आरोग्यदायी जीवनजगणारे आणि नियमित व्यायाम करणारा माणुस आहे.स्वभाव थोडासा फटकळ आहे पण या सर्व गुणांमध्ये तो झाकून जातो आसे सांगीतले.सेवापूर्ती कार्यक्रमाचे संचलन प्रा.डाॕ.बाळासाहेब गावडे तर आभार उपप्राचार्य भागीनाथ बांगर यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.डाॕ.आप्पासाहेब टाळके,प्रा.डाॕ.बाळासाहेब गावडे,प्रा.डाॕ.श्रीकांत धोंडे ,प्रा.आबासाहेब पोकळे,प्रा.दिगंबर पाटील,काकासाहेब सोले आदिंनी परिश्रम घेतले.