अवैद्य वाळू उपशाला आर्थिक व्यवहार करून पाठबळ देणारे मंडळ अधिकारी कठारे व तलाठी जाधव यांना तात्काळ निलंबित करा : विक्रम पाटील बामणीकर

23

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)

नांदेड(दि.30जून):-जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन वर्षापासून कुठेही शासनाच्या वतीने वाळू घाटाचा लिलाव किंवा बोली करून वाळू उपशाला परवानगी देण्यात आली नाही पण लोहा तालुक्यातील अंतेश्वर भारसावडा पेनुर व चित्रा वाडी येथे गेल्या दोन ते तीन वर्षापासून अवैधरित्या रात्रंदिवस वाळू उपसा चालू आहे पण याकडे या भागाचे मंडळ अधिकारी श्री कठारे व तलाठी श्री जाधव हे वाळूमाफियासी आर्थिक व्यवहारात पोटी रेती माफियांना रान मोकळे करून देत आहे.

मंडळ अधिकारी व तलाठी हे अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या कडून प्रत्येकी ताफा दोन हजार रुपये हायवा गाडीला दहा हजार रुपये व अवैध रेती टिप्पर मध्ये टाकण्यासाठी जेसीपी मशीन ला दहा हजार रुपये महिना घेऊन त्यांना अवैद्य मार्गाने पाठबळ देऊन शासनाचा कोट्यवधीचा महसूल पेनुरचे मंडळाधिकारी कठारे व तलाठी जाधव यांनी स्वतःच्या घशात घातला आहे याला जबाबदार धरून मंडळ अधिकारी व तलाठी यांना १५ दिवसाच्या आत निलंबित न केल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा व अवैध वाळू उत्खनन होत असल्याची माहिती असूनही रेती माफिया कडून लाखो रुपये घेऊन त्यांनी पाठबळ दिले आहे.

त्यामुळे त्यांची १५ दिवसाच्या आत चौकशी करून चौकशी अति दोषी मंडळ अधिकारी श्री कठारे व तलाठी जाधव यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंदवून त्यांना तात्काळ सेवेतून निलंबित करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन मराठा महासंग्राम संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष विक्रम पाटील बामणीकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.


विशेष म्हणजे नांदेड जिल्ह्यात तीन वर्षापासून कोणत्याही रेती घाटाचा लिलाव झालेला नसताना देखील अंतेश्वर भारसावडा पेनुर व चित्रा वाडी येथे गेल्या दोन ते तीन वर्षापासून येथील शासनाने कोणत्याही वाळू घाटाचा लिलाव केला नसताना देखील वाळूमाफियाना येथील मंडळ अधिकारी श्री कठारे तसेच तलाठी श्री जाधव यांच्याशी आर्थिक संगमत करून रॉयल्टी न भरताच गोदावरी नदीपात्रातून दिवस-रात्र तराफे द्वारे अवैधरीत्या रेती काढण्यात येते पण रेती माफिया कडून मंडळ अधिकारी आणि तलाठी हे आर्थिक व्यवहार करून त्या अवैध रेती उपसा आकडे पाठ फिरवून त्यांना पाठबळ देत आहेत पण लोहाचे तहसीलदार देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत हे दुर्दैवी बाब असल्याचे जनतेत बोलल्या जात आहे.

त्यासाठी जिल्हाधिकारी साहेब यांनी या गंभीर प्रकरणी तात्काळ आपल्या स्तरावरून चौकशी करून चौकशी अति दोषी मंडळ अधिकारी श्री कठारे व तसेच तलाठी श्री जाधव यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे नोंदवून त्यांच्याविरुद्ध तात्काळ निलंबनाची कारवाई सह त्यांना १५ दिवसाच्या आत शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन मराठा महासंग्राम संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष विक्रम पाटील बामणीकर यांनी दिले आहे दिलेल्या निवेदनावर त्यांची स्वाक्षरी आहे निवेदनाच्या प्रती मा विभागीय आयुक्त साहेब औरंगाबाद पोलीस अधीक्षक साहेब नांदेड व तहसीलदार साहेब लोहा यांना निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत आता तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावर जिल्हा अधिकारी कोणती कारवाई करतील याकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे.