ओबीसी विद्यार्थ्यांच्या पाठीत खुपसला खंजीर-कवडू लोहकरे यांचा आरोप

23

🔸मेडीकल निटओबीसी विद्यार्थ्यांच्या कोटा भरलाच नाही

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमुर(दि.2जुलै):-राष्ट्रीय वैद्यकीय आयोग व केंद्राने सर्वोच्च न्यायालयात माहिती दिली की ‘” राज्य सरकारच्या दिलेल्या वैद्यकीय व दंत जागा मध्ये ओबीसींना आरक्षणाचा या वर्षी लाभ देणे शक्य नाही'”त्यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांच्या ११००० जागांवर गदा येणार आहे. मेडीकल क्षेत्रात निट विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. ओबीसी ना २७ टक्के आरक्षणाची तरतूद असतांनाही केंद्र सरकार ने ओबीसी ना डावलून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जिवन उध्वस्त केले. असा आरोप राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कवडू लोहकरे यांनी केला आहे.२७ टक्के आरक्षणानुसार निट मेडीकल क्षेत्रात आँल इंडिया कोट्यातून ११००० जागा भरल्या जाणार होत्या पण केंद्राच्या व राष्ट्रीय वैद्यकीय आयोग यांच्या निर्णयामुळे ओबीसी विद्यार्थी रस्त्यावर येणार आहेत.

अगोदरच ओबीसीचे पदोन्नती तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण कमी करुन ओबीसी वर अत्याचार केला. संविधानाच्या कलम ३४० ओबीसी जनगणनेची असुनही ओबीसी वर राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात अन्याय केला जात आहे. संविधानात ओबीसींना घटनात्मक अधिकार असतांना प्रत्येक क्षेत्रात जाणीवपूर्वक डावलण्याचा षडयंत्र आहे. सरकार ला ३४१ व ३४२ कलमाची अंमलबजावणी करता येते पण३४०कलमाची अंमलबजावणी करता येत नाही. अनेक ओबीसी विद्यार्थ्यांनी निट मध्ये वैद्यकीय क्षेत्रात खुप मेहनत घेतली आहे. जर सरकार ने ओबीसी चा आँल इंडिया कोटा भरला नाही तर तिव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघ चिमुर चे कवडू लोहकरे यांनी दिला आहे.