दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या झाल्याशिवाय इतर कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्यास कोर्टाचा नकार – राजेंद्र लाड

    43

    ✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

    आष्टी(दि.2जुलै):-सामान्य प्रशासन विभागाच्या दि ५ मार्च २००२ च्या शासन निर्णयास अनुसरून सद्यस्थितीत वर्ग ३ व ४ च्या संवर्गातील दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची संधी उपलब्ध आहे.त्यास अनुसरून सद्यस्थितीत वर्ग १ व २ च्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची संधी उपलब्ध नसल्याने दिव्यांग कर्मचारी यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल आहे.सदर जनहित याचिकेची सुनावणी दिनांक २१ जून २०२१ रोजी म्यायालयात झाली असत। न्यायालयाने याचिका क्र. ६८१९ अन्वये दिनांक २९ जून २०२१ रोजी शासनाच्या सर्व प्राधिकरणांना जोपर्यंत दिव्यांग कर्मचाऱ्यांना वर्ग १ व २ मधील पदावर पदोन्नतीची संधी उपलब्ध होत नाही तोपर्यंत इतर कोणत्याही विभागाने सर्वसामान्य कर्मचाऱ्यांची पदोन्ती करु नये.

    अशा स्वरूपाचे आदेश देऊन वा आदेशाचा अवमान होणार नाही याची दक्षता घेण्याचे सर्व शासकीय प्राधिकरणांना आदेश दिले आहेत.अशी माहिती शासनमान्य दिव्यांग कर्मचारी संघटना बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड यांच्यासह प्रदेश उपाध्यक्ष महादेव सरवदे,जिल्हा सचिव इंद्रजित डांगे,जिल्हा कोषाध्यक्ष अर्जुन बडे,जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार मोरे,मधूकर अंबाड,रघुनाथ शिंदे,सौदागर कुर्हे,बाळासाहेब सोनसळे,अतुल मिटकरी,युवराज हिरवे,फुलचंद खाडे,बाळासाहेब कांबळे,दत्तात्रय गाडेकर,गणेश बहिर,प्रा.सतिष बिडवे,मच्छिंद्र राख,दिनकर खोमणे,गहिनीनाथ गिते,शेषराव सानप,महिला प्रतिनिधी श्रीम.संजिवनी गायकवाड,श्रीम.वैशाली कुलकर्णी,श्रीम.आशा बारगजे,श्रीम.शिल्पा वाघमारे,सविता ढाकणे इत्यादी पदाधिकाऱ्यांनी दिव्यांग कर्मचारी हितार्थ कळविले आहे.