केरूरत येथे दिव्यांग बांधवाचा थाळीनाद आंदोलन

    39

    ✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो.नं.9970631332

    नांदेड(दि.2जुलै);- जिल्ह्यातील दिव्यांगानी आपल्या हक्कासाठी दि २८जुन ते ९ जुलै २१ पर्यंत पासुन सुरू केलेले चार दिवसांपासून शासन प्रशासनास लोकप्रतिनिधी यांना दिसत नाहीत काय? असा संतप्त सूर दिव्यांग बांधवातून ऐकावयास मिळत आहे .दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलिकर* यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक गावात ग्रामपंचायत कार्यालय समोर कुंभकर्ण शासन प्रशासनास जागे करण्यासाठी आज चौथ्या दिवशी जिल्ह्यातील १०० गावात थालीनांद आंदोलन करण्यात आले.

    त्यात 1 जुलै २०२१ रोजी बिलोरी तालुक्यातील क्ग्रामपंचायत कार्यालय केरूर येथे दिव्यांगानी थालीनांद आंदोलनात घोषणेने थालीनांद करून परिसर दणाणून टाकले.दिव्यांग अँप मध्ये नोंदणी पासुन एकही दिव्यांग वंचित राहू नये म्हणून मा जिल्हाधिकारी साहेब यांनी तिन वेळा वेळापञक देऊन अकरा महिन्यात दिव्यांगा ना माहिती न देता आपल्या आदेशाची अंमलबजावणी न करणार्‍या दिव्यांगाना निधी व हक्कापासुन वंचित ठेवणार्‍या दोषी अधिकारी यांच्यावर कारवाई करावी, दिव्यांग कायदा 2016 ची अंमलबजावणी ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभा घेऊन योजनेची माहिती देऊन अंमलबजावणी करणे, पंचायत समिती अंतर्गत दिव्यांगाचा पाच टक्के निधी अनुशेष सहित वाटप न करणार्‍या गटविकास अधिकारी यांच्या वर कार्यवाही करावी, ग्रामपंचायतचा दिव्यांग राखीव पाच टक्के स्वनिधी व तेरावा, चौदावा, पंधरावा विकासातून 2016 ते आज पर्यंत राखीव दिव्यांग निधी न देणार्‍या दोषी अधिकारी यांचा आढावा घेऊन त्वरीत वाटप देण्यात यावा.

    दिव्यांगाना घरकुल योजनेतून प्राधान्य क्रमाने घरकुल गावातील रिकाम्या जागेत त्वरीत देण्यात यावी, दिव्यांगाना स्वरोजगार करण्यासाठी गाळे किंव्हा 200 फुट जागा त्वरीत देण्यात यावी, दिव्यांग कायदा 2016 कलम 92 ए, बी, सी प्रमाणे दिव्यांगाना ञास देणार्‍या दोषींवर कारवाईमुळे करावी आदी मागण्यांचा समावेश होता.थाळीनाद आंदोलनात बालाजी
    होनपारखे, बु श्रीरामे, बाबु शेख, सिधार्थ नरवाडे, अनुराधा , हाजुमिया शेख,ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच,सदस्य यांनी दिव्यांग बांधवांना आश्वासन दिले दिव्यांगांची आंदोलन यशस्वी केले.