ऐतिहासीक देवस्थान माणिकशाह बाबा च्या जागेवरील अतिक्रमण काडून हद्द व खुणा निश्चित करा

30

🔹माजलगाव धरणाच्या भिंतीवर ५ जुलै रोजी सय्यद सलीम बापू यांचे आंदोलन

✒️माजलगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

माजलगाव(दि.२जुलै):-माजलगाव येथील ऐतिहासिक माणिकशाह बाबा च्या जागेवरील झालेले अतिक्रमण तात्काळ काडून हद्द व खुणा निश्चित करून घ्याव्यात या मागणीसाठी लोकतांत्रिक जनता दलाच्या वतीने जील्हाध्यक्ष सय्यद सलीम बापू आपल्या असंख्य कार्यकर्त्या सह माजलगाव धरणाच्या भिंतीवर भव्य आंदोलन करणार आहेत.

सविस्तर असे की माजलगाव धरणामधील देवस्थान माणिकशाह बाबाची दर्गा धरण निर्मिती वेळेस सन १९७९ ते १९८० मध्ये पाडण्यात आली व त्यावेळी शासनाने या पवित्र देवस्थानाचे अवशेष सर्व्हे नं.८ मध्ये ४ एकर जमीन घोषीत करुन क्याठिकाणी ठेवण्यात आले. परंतू चिंचगव्हाण ग्रामपंचायत व माजलगाव तहसीलच्या मेहरबानीने या देवस्थानाच्या ४ एकर जमीनीवर अतिक्रमणे वाढत गेले व या पवित्र साहित्याची विटंबणा करण्यात आली. या विषयी तात्कालीन सात हजार आंदोलकांनी आंदोलन करुन, अटक होवून देखील सदरील देवस्थानाच्या साहित्याची निगराणी करण्यात आली नाही. चिंचगव्हाण ग्रामपंचायत अतिक्रमण धारकांचे संरक्षण करुन या विषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांना चुकीची व खोटी माहिती देतात.

चिंचगव्हाण पुनर्वसन मध्ये जवळपास ४३ एकर जमीन शासनाची गायरांन देण्यात आली. या मध्ये मंदिर, मस्जिद, स्मशानभूमी, कब्रस्तान, समाज मंदिर, ईदगाह, चावडी, दर्गा यांना पुनर्वसन करण्यात आले. परंतू दर्गा, मस्जिद, कब्रस्तान, ईदगाह यांची जागा कोठे गेली ? असा सवाल ही सलीम बापू यांनी केला तरी शासनाने ऐतिहासीक देवस्थान माणिकशाह बाबा यांना योग्य न्याय देवून देवस्थानची जमीन रिकामी करुन ताबा देण्यात यावा हद्द, खुणा व निश्चित करण्यात यावे अन्यथा लोकतांत्रिक जनता दलाच्या वतीने दि.०५/०७/२०२१ रोजी माजलगाव धरणावर भव्य आंदोलन करण्यात येईल असे उपविभागीय अधिकारी कार्यालय माजलगाव यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे