जि.प.बीड ची एकमेव मुलींची आदर्श शाळा – कन्या प्रशाला आष्टी

39

मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी,स्वरक्षणाची हमी देणारी, बेटी बचाव…बेटी पढाव…उपक्रम राबविणारी शाळा

बीड जिल्ह्यातील तालुका आष्टी शहरातील नगरपंचायतीच्या हद्दीत असलेली व आष्टी – खडकत रोड लगत असलेली तसेच आष्टीच्या बसस्थानकापासून अवघ्या पाच मिनीटाच्या अंतरावर येणारी ही बीड जिल्ह्यातील एकमेव मुलींची जि.प.बीड ची आदर्श शाळा होय.वास्तविक पाहता जिल्ह्यात यापूर्वी अनेक जिल्हा परिषदेच्या फक्त मुलींसाठी शाळा होत्या.पण कालांतराने अनेक शाळा मोडकळीस निघाल्या आहेत.त्यातच जिल्हा परिषद कन्या प्रशाला आष्टी, ता. आष्टी, जि.बीड ही आजही मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी तग धरुन उभी आहे.शहरासह ग्रामीण भागातील अनेक होतकरु, कष्टाळू, गोरगरीबांच्या,
ऊसतोड कामगारांच्या, मजुरांच्या तसेच आर्थिक दुर्बल घटकातील पालकांच्या विद्यार्थीनीं शाळेत आजही शिक्षण घेत आहेत.

या शाळेवर आजवर अनेक आदर्श शिक्षक होवून गेलेले आहेत. त्यांचेही या शाळेसाठी मोठे योगदान आहे. तसेच या शाळेत आजवर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थीनीं मोठ – मोठ्या पदावर कार्यरत आहेत. या शाळेतील अनेक विद्यार्थीनींनी आजवर माध्यमिक शालांत परिक्षेत ९० टक्क्याच्या वरती गुण घेतलेले आहेत.क्रिडा स्पर्धेतही राज्य पातळीपर्यंत अनेक विद्यार्थीनीं गेलेल्या आहेत.आजही या शाळेचा सर्वत्र नावलौकिक आहे.
बीड जि.प.ने १९५२ साली आष्टी तालुक्यातील मुलींच्या शिक्षणासाठी या शाळेची स्थापना केली होती. शाळेत इ.१ली ते इ.१० वी पर्यंतचे २४ वर्ग तुकडीसह आहेत. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ करून त्यांचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी वेगवेगळे उपक्रम या शाळेत राबविण्यात येतात. स्थापनेपासून आजपर्यत या शाळेत इमारत बांधकाम,भव्य व्यासपिठ,संरक्षक भिंत,पाण्याचा हौद,शौचालय आदी सोई उपलब्ध झालेल्या असून यामुळे शाळेची पटसंख्या वाढलेली आहे.

पालक, शिक्षणप्रेमी नागरिक, लोकप्रतिनिधी, शाळा व्यवस्थापन समिती, नगरपंचायत चे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक, जि.प.सदस्य, पं.स.सदस्य यांच्या सहकार्याने या शाळेचा कायापालट होताना दिसत आहे. सर्व वर्ग डिजिटल बनविण्याचे काम चालू आहे. गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्याचा शारीरिक विकास होण्यासाठी शाळेला भव्य क्रिडांगण आहे. मुलींना शाळेत एलईडी टि.व्ही., मोबाईलद्वारे व्हिडीओ दाखवून प्रत्यक्ष अनुभव दिले जातात. सध्याच्या कोरोना काळात शाळा बंद पण शिक्षण चालू या उपक्रमांतर्गत आँनलाईन शिक्षण दिले जात आहे. ज्ञानार्जनाबरोबरच शाळेचा परिसर स्वच्छ, वृक्षारोपण, वाढदिवस, जयंती, विविध स्पर्धा यांचे आयोजन करून सर्वांगिण विकासाला चालना दिली जाते.शाळा फक्त मुलींचीच असल्यामुळे ” बेटी बचाव,बेटी पढाव ” या संर्दभाने अनेक वेगवेगळे उपक्रम या शाळेत राबविले जातात.

समाजसहभागाच्या माध्यमातून व शाळा व्यवस्थापनाच्या कामातून शाळेचा भौतिक व विद्यार्थीनींचा सर्वांगीण विकास करणे चालू आहे.शाळेत इ.१० वी विषयाचे,एन.टी.एस.,इ.८,५ वी शिष्यवृत्ती,नवोदय,एन.एम.एम.एस.चेजादा तास नियमितपणे घेतले जात आहेत.२१व्या शतकाकडे सामोरे जातांना मुलींना चांगले जबाबदार नागरिक तयार करणे हे शाळेचे ध्येय असून फक्त ज्ञानी असून चालणार नाही तर माणूस म्हणून घडविण्याचे काम शाळा करत आहे.यासाठी शाळेतील सर्व आदर्श व गुणी शिक्षकांचे सहकार्य मोलाचे लाभत आहे.संगणक कक्ष,सुसज्ज वाचनालय,भव्य क्रीडा स्पर्धा,शैक्षणिक सहल,सांस्कृतिक कार्यक्रम,एक मुलगी – एक झाड,कायदेविषयक शिबीर,बेटी बचाव…बेटी पढाव याबाबत उपक्रम,विविध शालेय – सहशालेय उपक्रम,नवीन सुसज्ज इमारत बनविणे तसेच शाळेचे नाव महाराष्ट्रात व्हावे यासाठी सर्व शाळेतील शिक्षकांच्या मदतीने काम सुरु आहे.

बीड जि.प.ने १९५२ साली ही शाळा सुरु केली असून या शाळेची तीन मजली इमारत १९८२ साली बांधण्यात आली होती.सध्या इमारतीच्या भिंतींना तडे गेलेले असून छत जीर्ण झाले आहे.अशा मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये विद्यार्थीनीं व शिक्षक जीव मुठीत घेवून शिक्षण घेत व देत आहेत.२६ शिक्षक,२ व्यावसायिक शिक्षण प्रशिक्षक व ३ शिपाई असा स्टाफ असून अध्यापनासाठी एकूण २४ वर्गखोल्या आवश्यक आहेत.नवीन इमारतीत १२ वर्गखोल्या बनविण्यात आल्या असून तसेच सध्या नवीन इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचे काम युध्दपातळीवर चालू आहे.आणखीन वर्गखोल्या,बैठक कक्ष,कार्यालय,मु.अ.खोली,संगणक कक्ष,स्टाफ रुम इ.मिळून १२ खोल्यांची तीन मजली इमारतीची आवश्यकता आहे.जुनी तीन मजली इमारत धोकादायक झाली असून प्रशासनाने नवीन इमारत मंजूर केलेली आहे.

दोन मजली इमारत पूर्ण होत असून उर्वरित तिसरा मजला तात्काळ बांधणे विद्यार्थ्यांच्या हिताचे आहे.तरी तात्काळ प्रशासनाने तीन मजली इमारत लवकरात लवकर बांधून पूर्ण करावी.ही मुख्याध्यापक व शाळेतील शिक्षकांची महत्त्वाची प्रशासनाकडे मागणी आहे.शाळेतील शिक्षक जीव ओतून काम करत आहेत.त्यामुळे शाळेतील विद्यार्थीनींचे पालक समाधानी आहेत.शिक्षकांची तळमळ यातून काय घडू शकते हे या शाळेच्या वेगवेगळ्या परिक्षांच्या निकालावरुन दिसून येत आहे.पालक ” शाळा गावाची अन् गाव शाळेचा ” या उक्तीप्रमाणे शाळेला सततच तन – मन – धनाने सहकार्य करत आहेत.येथे मुलींचा सर्वांगीण विकासच होत नाही तर मुलीं स्वरक्षणाचेही धडे घेतांना दिसताहेत.त्यांच्यात जिद्द,चिकाटी,आत्मविश्वास व स्वावलंबीपणाही दिसून येत आहे.या शाळेतील शिक्षक तळमळीने ज्ञानदानाचे कार्य करीत असतांना त्यांना या शाळेतील विद्यार्थीनींचे पालक आपली हक्काची शाळा समजून शाळेस सर्वतोपरी सहकार्य करीत आहेत.

त्यामुळे या शाळेतील विद्यार्थीनींचा,शिक्षकांचा व ग्रामस्थांचा शाळा व्यवस्थापन समितीला सार्थ अभिमान आहे.तसेच शाळेतील शिक्षक स्वतःच्या मुलींप्रमाणे सर्व शाळेतील मुलींची काळजी घेतात.ही बाब अत्यंत उल्लेखनीय आहे.शाळेत नित्यनियमाने नवनवीन गोष्टी शिकवल्या जात आहेत त्यामुळे मुलींना नवीन शिकण्याची संधी मिळून त्यांना स्वतःला सिद्ध करण्याची प्रवृत्ती निर्माण होत आहे.यांचे शाळेला मोलाचे शैक्षणिक योगदान जि.प.बीड चे मुख्यकार्यकारी अधिकारी अजित कुंभार साहेब यांच्या प्रेरणेने शिक्षणाधिकारी विक्रम सारुक साहेब,श्रीकांत कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव साहेब,विस्तार अधिकारी अर्जुन गुंड साहेब,केंद्रप्रमुख त्रिंबक दिंडे साहेब यांच्या समन्वयातून शाळेचे मुख्याध्यापक आबासाहेब खताळ साहेब यांच्या सुयोग्य नियोजनाखाली शिक्षक श्रीम.खेडकर एस.डी.,श्रीम.कुटे एस.ए.,श्रीम.दहिफळे एस.व्ही.,नरोड एस.एम.,दळवी एस.टी.,श्रीम.टेकाडे एस.बी.,श्रीम.बागवान एन.एन.,भोकरे एस.टी.,श्रीम.मिर्झा एस.एल.,जगताप व्ही.डब्ल्यू.,श्रीम.भापकर बी.व्ही.,श्रीम.तरटे एल.बी.,लाड आर.एस.,गाडेकर डी.टी.,शिंदे डी.बी.,श्रीम.शिंदे ए.आर.,श्रीम.करपे आर.सी.,आव्हाड एस.डी.,श्रीम.गायकवाड एस.बी.,श्रीम.शिंदे जे.डी.,श्रीम.धस ए.पी.,श्रीम.कार्ले आर.सी.,राऊत एस.ए.,श्रीम,खेत्रे एस.एस.खंडागळे एस.के.,व्यावसायिक शिक्षण प्रशिक्षक वायाळ भागवत,कुलकर्णी विशाखा तसेच सेवक संतोष धोंडे,श्रीम.सावित्रा जाधव,श्रीम.मनिषा पिंपरे यांचे शाळेला मोठ्या प्रमाणात योगदान आहे.सध्या शाळेत एकूण ७८९ विद्यार्थीनीं शिक्षण घेत आहेत.

अशा या सर्वगुणसंपन्न शाळेचा आष्टी ग्रामस्थांना अभिमान आहे.चला तर मग आष्टी शहरातील व शेजारी असलेल्या ग्रामीण भागातील पालकांनी आपल्या मुलींचा आजच प्रवेश निश्चित करावा.असे आवाहन शाळा व्ववस्थापन समिती अध्यक्षा श्रीम.शेख रिजवाना,उपाध्यक्षा श्रीम.गायकवाड आम्रपाली,सदस्य लक्ष्मणराव रेडेकर,गंगाधर मारुती,श्रीम.धाकड मनिषा,श्रीम.बेग अमरीन,श्रीम.धोत्रे राणी,श्रीम.साबळे रेखा,श्रीम.झगडे सुजाता,श्रीम.टिळेकर निर्मला,श्रीम.झरेकर सुजाता,श्रीम.आशा शिंदे,कु.समृद्धी दळवी,कु.क्रांती सुंबरे व शिक्षकांच्या वतिने करण्यात येत आहे.

✒️राजेंद्र लाड,आष्टी(राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक)मो:-४२३१७०८८५