नक्षलवाद्यांनी पुरुन ठेवलेल्या 15 लाख 96 हजार रुपयांच्या रोख रकमेसह स्फोटक साहित्य जप्त

22

🔸गडचिरोली जिल्हा पोलीस दलास मिळाले यश

✒️गडचिरोली विभागीय,प्रतिनिधी(चक्रधर मेश्राम)

गडचिरोली(दि.3जुलै):-गडचिरोली जिल्ह्यात विविध प्रकारच्या विकास योजना आणि शासकीय कामे केली जातात. मात्र जिल्ह्याच्या विकासासाठी काम करणाऱ्या शासकीय खाजगी बांधकामे कंत्राटदार , तेंदूपत्ता ठेकेदार , सामान्य नागरिक यांचे कडून नक्षलवादी मोठ्या प्रमाणात खंडणी वसूल करून ती रक्कम देश विघातक कृत्यांसाठी वापरली जाते. तसेच खंडणीतुन जमा झालेल्या रक्कमेचा विनियोग शस्त्रसाठा साहित्य, दारू गोळा या कामात वापरल्या जातो.. नक्षलवादी हे गडचिरोली जिल्ह्यात पैसे, दारुगोळा , आणि शस्त्रसाठा गोपनिय ठेवतात अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी आज दि. २ जुलै रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली .
दि. १ जुलै २०२१ रोजी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली नक्षलविरोधी अभियानाचे आयोजन करुन सी /६० आणि इतर अनेक अभियान पथकांच्या जवानांनी मिळून एटापल्ली पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पोमके हालेवारा हद्दीत, कुदरी जंगल परिसरात खूप मोठी जोखीम घेऊन नक्षल विरोधी अभियान राबविले. या अभियानात गडचिरोली पोलीस जवानांना खुप मोठे यश मिळाले. त्यात १५ लाख ९६ हजार रुपये रोख रक्कम,, ४ इलेक्ट्रॉनिक बटन , ३ डेटोनेटर , २ वायर बंडल , १ वाकिटाकी , नक्षल पांम्पलेट, बॅनर , पिटटु व इतर अनेक साहित्य हस्तगत करण्यात आले. सापडलेल्या नोटांमध्ये नवीन चलनात असलेल्या २००० रु. चा जास्त प्रमाणात समावेश आहे.

हस्तगत करण्यात आलेले सर्व साहित्य गडचिरोली जिल्ह्या पोलीस मुख्यालयात आणुन या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलविरोधी अभियानाच्या विविध प्रकारच्या कारवाया करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक ( अभियान) मनिष कलवानिया , अप्पर पोलीस अधीक्षक ( प्रशासन) समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले, यांच्या मार्गदर्शनाखाली नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांना आळा घालण्यासाठी अथक प्रयत्न केले जात आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील सदर डंप पोलीस जवानांनी हस्तगत केला आहे. त्यामुळे या भागात नक्षलवाद्यांना मोठ्या प्रमाणात हादरा बसला आहे. गडचिरोली जिल्ह्य पोलीस दलाची तीक्ष्ण नजर नक्षलवाद्यांवर असल्याने खंडणी वसूल करणे नक्षलवाद्यांना आता अडचणीचे होणार आहे. गडचिरोली जिल्ह्या पोलीस जवानांच्या पथकांनी केलेल्या कामगिरी बद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी अभियानात सहभागी असलेल्या विशेष अभियान पथकांच्या जवानांचे मनपूर्वक कौतुक केले आहे. आणि सदर परिसरात नक्षलविरोधी अभियान गतीमान करण्याचे संकेत दिले आहे.