मानव विकास परिषद संस्थेचे गेवराई तालुका अध्यक्ष पदी युवा पत्रकार नवनाथ आडे यांची निवड

18

✒️नवनाथ आडे(गेवराई प्रतिनिधी)

गेवराई(दि.३जुलै):- मानव विकास परिषद संस्थेचे गेवराई तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल मा.श्री नवनाथ आडे यांनी मानव विकास परिषद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री अफसर शेख साहेब व मानव विकास परिषद संस्थेचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री. बळवंत मनवर साहेब तथा मानव विकास परिषद संस्थेचे बीड जिल्हा अध्यक्ष मा. श्री. अँड. अझीद सय्यद साहेब यांचे आभार मानले सामाजिक माध्यमांद्वारे आपल्या भावना व्यक्त करताना नवनाथ आडे म्हणाले. मानव विकास परिषद संस्थेचे गेवराई तालुका अध्यक्ष पदी संस्थेने मला संधी दिल्याबद्दल स्वतः ला धन्य मानतो आणि ही संधी दिल्याबद्दल मानव विकास परिषद संस्थेचे सर्व पदाधिकारी या सर्वाचे त्रुणी आहे.

मला विकास परिषद संस्थेची तालुक्याची जबाबदारी दिली, काम दिले आयुष्यभर सामाजिक कामात असलेल्या व्यक्तीला काम नसेल तर ते वाटते, माझी निष्ठा, तळमळ, मानव विकास परिषद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री अफसर शेख साहेब यांनी माझी निष्ठा, तळमळ, जाणली त्याबद्दल त्यांचे आभार. माझ्या क्षमतेच्या अत्युच्च पातळी पर्यंत मी काम करीत राहिल . माझ्या जबाबदारीला न्याय देण्याचा आणि हक्कांसाठी काम करण्याचा मी प्रमाणिकपणे प्रयत्न करीत राहिल. मानव विकास परिषद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री अफसर शेख व मानव विकास परिषद संस्थेचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री. बळवंत मनवर साहेब तथा मानव विकास परिषद संस्थेचे बीड जिल्हा अध्यक्ष अँड. अझीद सय्यद साहेब आणि सर्व पदाधिकारी या सर्वाचे आशिर्वाद आणि मार्गदर्शन नेहमी मिळावे आणि मिळतच राहिल याची खात्री आहे.

या सर्वाचे आभार नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी मी हे पद व्रत म्हणून उपयोगात आणेल. यातून मिळणारे समाधान हाच माझ्यासाठी मोक्ष असेल म्हणूनच म्हणावेसे वाटते. धन्य भाग सेवा का अवसर पाया चरणकमल की धूल बना मैं.. मोक्ष द्वारा तक आया..। हा पद म्हणजे माझ्या सामाजिक कार्याचा केलेला सन्मान आहे या सन्मानामुळे आजवर केलेली मेहनत, निष्ठा आणि प्रामाणिकपणाबद्दल अभिमान वाटतो हे पद मला नेहमीच माझ्या जबाबदारीची जाणीव करून देत राहिल. आपल्या प्रमाणिकपणाचे कौतुक कोणी जाणीवपूर्वक केले तर ते मनाला सुखावून जाते आणि पुढील प्रगतीसाठी स्फूर्ती मिळते भविष्यातील माझ्या नव्या संकल्पनांना प्रोत्साहन मिळाले आहे. या ऊर्जेवर पुढील काळात मला अधिक चांगले आणि आदर्शवत काम उभे करण्यास मदत होईल. सामाजिक जाणीव ठेवून काम करण्यास एक व्यावसायिक म्हणून माझी जबाबदारी वाढली आहे. माझ्या वाटचालीस संस्थेच्या माध्यमातून यशाचे वलय लाभेल त्यामुळे मला आनंद व्यक्त असून हा आनंद सर्वसामान्यांच्या जीवनात पेरण्याचे काम यापुढेही माझ्याकडून होईल .

सामाजिक कार्यात काम करताना शाबासकीची थाप देऊन तु फक्त लढ म्हणा असे म्हणण्याने नवीन उर्जा मिळते. संस्थेचे जबाबदारी अशीच ऊर्जादायी आहे. त्यामुळे मानव विकास परिषद संस्थेची कामाची जबाबदारी वाढली आहे. आणि नव्या जोमाने काम करण्यासाठी उर्जा मिळाली आहे.
मला भविष्यात जनतेच्या हितासाठी भविष्यात काम करण्यासाठी खूप काही प्रेरणा मिळेल जोमाने काम करण्यासाठी मला उमेद मिळाली आहे. माझ्या सामाजिक आध्यात्मिक दिव्यांगांसाठी व गोरगरीब सर्व सामान्य जनतेसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन मला अधिक कार्य करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. यामुळे माझ्यासह अनेकांना भविष्यात समाजोपयोगी कार्य करण्यासंदर्भात ऊर्जा व प्रेरणा देणारी अशी ही मानव विकास परिषद संस्था आहे. या संस्थेमुळे समाजात मिळणारे आदारचे स्थान आहे. माझ्या कामाला संस्थेच्या माध्यमातून जनतेने दिलेली पोहचवली आहे. यामुळे अधिक जोमाने काम करण्यासाठी प्रेरणा मिळाली असून यापुढे ही समाजसेवा सैदव करत राहिल.. मी अधिक कार्यशील होऊन भ्रष्टाचार, अत्याचार, अन्याय, दिव्यांग, शैक्षणिक, या संदर्भात नाविन्यपूर्ण कार्य करून दाखवील असा मला आत्मविश्वास आहे. तसेच मानव विकास परिषद संस्थेने मला तालुक्याची जबाबदारी याबद्दल मी शतशः त्रुणी आहे. अशा भावना मानव विकास परिषद संस्थेचे गेवराई तालुका अध्यक्ष युवा पत्रकार नवनाथ आडे यांनी व्यक्त केल्या आहे