जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे आमदार संजय गायकवाड यांच्यावर अट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

23

✒️मलकापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मलकापूर(दि.3जुलै):-बुलढाणा जिल्ह्यातील चितोडा या गावी दोन कुटुंबातील वाद हा वैयक्तिक असताना या बुलढाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड यांनी चितोडा गावी जाऊन सांमज्याचे व शांततेचे आवाहन गावकऱ्यांना न करता दोन समाजामध्ये वाद होतील अशाच प्रकारचे चिथावणीखोर वक्तव्य बौद्ध समाजाच्या विरुद्ध करून समाज बांधवांच्या भावना दुखावल्या असल्यामुळे त्याच्यावर अट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करावी याबाबतचे निवेदन जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे, जिल्हा संघटक भाऊराव उमाळे,भा. बौध्द महासभा जिल्हाध्यक्ष एस. एस. वले सर यांच्या मार्गदर्शनाखाली तथा तालुकाध्यक्ष सुशील मोरे यांचे नेतृत्वात जिल्हा पोलीस अधीक्षक यांना मलकापूर पो.स्टे. ठाणेदार मार्फत देण्यात आले.

सदर निवेदनात म्हंटले आहे की, आमदार संजय गायकवाड यांनी चितोळा येथे म्हंटले की तुमच्यावर कुणी ॲट्रॉसिटी केली तर त्याच्या विरोधात खोटा गुन्हा दाखल करा म्हणजेच अपशब्द वापरून म्हंटले की बौद्ध केसेस मागे घेतील अशा बेताल वक्तव्य करून मागासवर्गीय समाजाच्या भावना दुखावल्या.

तसेच यापुढेही जाऊन आमदार म्हणाले की, जर हे लोक ऐकत नसतील तर आसपासच्या पाच-पंचवीस खेड्यातील लोक जमा करून त्यांच्या विरोधात रान पेटवा. मी स्वतः दहा हजाराची फौज घेऊन येतो व शस्त्रही पूरवतो आणि यांना बेकायदेशीररित्या आपण सरळ करू, असे बेताल व्यक्तव्य केले. या आमदारावर गैरकायद्याचे लोक जमविने, शस्त्रास्त्र पूरवण्याची भाषा करणे, खोट्या केसेस करण्याचे आवाहन करणे, मी लोक पुरवितो हे व्यक्तव्य करणारे आमदारावर ॲक्ट्रासिटी व इतर कलमान्वये गुन्हे दाखल करावेत,याबाबत खामगाव पो.स्टे.मध्ये रीतसर फिर्याद दाखल आहे तरी राज्यातील मागासवर्गीय समाजातील लोकांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदन देतेवेळी ता. उपाध्यक्ष दिलीप वाघ, गजानन झनके,विनोद निकम,विलास तायडे, गणेश सावळे, शेख यासीन कुरेशी,संघटक अजाबराव वानखेडे,सर्कल प्रमुख विनोद मोरे, भा.बौ.म. तालुकाध्यक्ष राजू शेगोकार,उपाध्यक्ष महादेव तायडे, कडू धुरंधर,वंचित आघाडीचे धम्मपाल उमाळे,सचिन तायडे,जनार्दन इंगळे,दगडु राणे,अशोक भालशंकर, सिद्धार्थ इंगळे,मधुकर निकम हरीचंद्र गुरचळ,बाळू बावस्कर,राजेश इंगळे,सतीश सावळे,सम्राट सावळे,मिलिंद सुरडकर आदी उपस्थित होते