राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कोरचीच्या वतीने केंद्र सरकारच्या भाव वाढीच्या निषेधार्थ आंदोलन

27

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

कोरची(दि.3जुलै):-शनिवारला राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. जयंतरावजी पाटील साहेब तसेच गडचिरोली जिल्हाध्यक्ष रविभाऊ वासेकर साहेब यांच्या आदेशाने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कोरचीच्या वतीने नाकर्त्या केंद्र सरकारच्या सतत गॅस सिलेंडर, पेट्रोल, डीज़ल व इतर जीवनावश्यक वस्तुंच्या भाव वाढीच्या निषेधार्थ आज कोरची येथील मुख्य चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुकाध्यक्ष प्रतापसिंग गजभिये यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. या वेळी ही सरकार उद्योग पतींचे पोट भरणारी सरकार आहे आणि आम जनतेचे पोट कापणारी सरकार आहे. “अबकी बार दोसौ पार बस करो मोदी सरकार” बोहोत हुई महँगाई की मार बस करो मोदी सरकार” या घोषणा देऊन केंद्र सरकारचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोरचीच्या वतीने जाहिर निषेध करण्यात आला….

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष प्रतापसिंग गजभिये, शहर अध्यक्ष अविनाश हुमणे, महिला शहर अध्यक्ष अर्पणा साखरे, युवक तालुका अध्यक्ष स्वप्निल कराडे, शहर अध्यक्ष चेतन कराडे, आनंद पंधरे, नंदकिशोरजी वैरागडे,मौशिम जाडिया, विनोद गुरणुले, रामनाथ कोरचा, राकेश मोहूर्ले, प्रशांत दखणे, चंचल जांभळे, सुरेखा टेंभूरकर, शारदा नैताम, हिरालाल सयाम, दिपक मोहूर्ले, सुनिल कुमरे, धम्मदीप लाडे, भूमेश्वर चोपकार, कांता साहारे, रशिका बोगा, रंजना मडावी, सुनिल कोरेटी, विशाल जांभळे तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.