येवला,अंदरसुल गटात शिवसेनेला खिंडार,कचेश्वर काळे यांचा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

25

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.3जुलै):-येवला तालुक्यातील शिवसेनेचे अंदरसुल गट कार्यकारणी अध्यक्ष व माजी गणप्रमुख अंदरसुल कचेश्वर लक्ष्मण काळे,तसेच देवळाणे ग्रामपंचायत उपसरपंच श्री.गोरख पर्वत काळे,राजापूर गटातून माजी सरपंच भाऊमच्छिंद्र सोमासे,डोंगरगाव येथील माजी ग्रामपंचायत सदस्य विलास नाना सोमसे यांचा आज येवला येथील छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयात, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश झाला त्यावेळी भुजबळांनी पक्ष प्रवेश झालेल्यांचा सत्कार केला.

तेंव्हा कचेश्वर काळे यांनी अंदरसुल गटात पक्ष वाढीसाठी मोठा कार्यक्रम घेणार असल्याची इच्छा व्यक्त केली.तेंव्हा कोरोनाचे वातावरण हटल्या नंतर कार्यक्रम आयोजित करू असे पालकमंत्री भजबळांनी आश्वासन दिले.त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते अरुण मामा थोरात,अंदरसुल उपबाजार समिती सभापती,मकरंद सोनवणे,येवला राष्ट्रवादी ता.अध्यक्ष साहेबराव मढवई,उपतालुका अध्यक्ष विनायक भोरकडे,माजी पंचायत समिती उपसभापती रामदास काळे,येवला नगरसेवक प्रवीण बनकर,संजय सोमसे,लोंढे नाना,विक्रम त्रिभुवन यांच्या सह आदी उपस्थित होते.