गायरान प्रश्नां विषयी गायरान हक्क अभियानाच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना दिले विवीध मागण्यांचे निवेदन

    38

    ?अंबाजोगाई तालुक्यातील गायरान जमिनी अतिक्रमण धारकांच्या तात्काळ नावे करा- अॅड.विलास लोखंडे

    ✒️नवनाथ पौळ(अंबाजोगाई,विभाग प्रतिनिधी)मो-8080942185

    अंबाजोगाई(दि.3जुलै): अंबाजोगाई या ठिकाणी दिनांक 3 जुलै रोजी गायरान हक्क अभियानाच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालय यांना गायरान निष्काशीत करत असताना फक्त गोर गरीब मागासवर्गीय व आदिवासी बांधवांचे गायरान निष्काशीत करून अन्याय केला जात आहे.या संदर्भात निवेदन देण्यात आले. मुळात महाराष्ट्र सरकारने सध्या गोर गरीब व समाजावर गायरान निष्काशीत करून खुप मोठा अन्याय चालू केला आहे. हे गायरानधारक गेल्या 30 ते 40 वर्षांपासून मोठ्या कष्टा

    तून ,अनंत अडचणीतून गायरान कसून खाऊन आपली उपजीविका भागवत आहेत, बरे या खेड्यातील गायरणावरती फक्त SC St चेच अतिक्रमण आहे असे नाही गावातील धनधांडगे सवर्ण गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांनीही अतिक्रमण केले आहे.काही ठिकाणी गायराणावरती प्लॉटिंग आहेत, खडी केंद्र आहे, वीट भट्टी आहेत, पेट्रोल पंप आहेत, महाराष्ट्र शासन हे या धन धांडग्या सवर्णांच्या अतिक्रमनाला हात लावत नाही, आणि फक्त मागासवर्गीय आणि आदिवासींच्या गायराणावर वनविभागाच्या नावाखाली वृक्ष लावत आहेत, हाअन्याय सद्या महाविकास आघाडी सरकारने गोर गरीबावर चालू केला आहे.

    गायरान निष्काशीत करत असताना गायराणाची हद्द निश्चित केली जात नाही, संबंधित सर्व्हे नं/ गट नं चे हद निश्चित करून खुंटले रोवत नाहीत, आणि फक्त वाहिती गायरान निष्काशीत केली जात आहेत, या संदर्भात काल निवेदन देण्यात आले.
    या वेळेस गायरान हक्क अभियानाचे जिल्हाध्यक्ष धम्मानंद कासारे, वंचित ब आघाडी जिल्हा उपाध्यक्ष शैलेश भाऊ कांबळे, वंचित प्रवक्ता गोविंद मस्के, राहुल जोगदंड, मुंजा गायकवाड, लाडेगाव मधील गायराण धारक वंचितचे तालुका महासचिव अमोल जोगदंड, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.