धरणगाव येथे जन्मदिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण व ग्रंथ भेट

    43

    ✒️धरणगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    धरणगांव(दि.3जुलै):- शहराचे माजी उपनगराध्यक्ष दिपकराव वाघमारे व सामाजिक कार्यकर्ते बबलू मराठे यांच्या जन्मदिनाप्रसंगी आय.टी.आय कट्टा मित्र परिवाराच्या वतीने वृक्षारोपण व अनमोल ग्रंथ भेट देऊन अनोखा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये राष्ट्रवादीचे उपजिल्हाध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष दिपकराव वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते व कट्टा मित्र परिवाराचे सदस्य बबलू मराठे या महनीय व्यक्तींच्या जन्मदिनाचे औचित्य साधून या मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच, सत्कारार्थींना राष्ट्रपिता महात्मा फुले यांचे ‘शिवजयंतीचे जनक ‘ व वामन मेश्राम साहेब लिखित डी.एन.ए.अनुसंधान असे अनमोल पुस्तकं भेट देण्यात आले.

    याप्रसंगी पी.डी.पाटील उपस्थितांना म्हणाले की, कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे जगात ऑक्सिजन अभावी कित्येक लोकांना प्राण गमवावे लागले. म्हणून वृक्षसंवर्धन गरजेचे आहे. तसेच, ‘पुस्तक हे मस्तक घडवतं आणि घडलेलं मस्तक हे कधीच कुणापुढं नतमस्तक होत नसतं ‘. म्हणून चांगली पुस्तकं घरोघरी गेली पाहिजेत. असे समाजोपयोगी उपक्रम राबविणारे पुस्तकमित्र, वृक्षमित्र व सर्पमित्र परिवाराचा उपक्रम खुपच वाखाण्याजोगा आहे.असेही सर यांनी सांगितले.“वृक्षारोपण व पुस्तक भेट” कार्यक्रम प्रसंगी समीर भाटिया म्हणाले की, वाढदिवसाप्रसंगी प्रत्येकाने “बुके न देता बुक द्यावे. व पुष्पगुच्छ ऐवजी वृक्ष द्यावे.”

    यावेळी आय.टी. आय कट्टा प्रमुख सुनील लोहार, समीर भाटिया, पी.डी.पाटील, ज्ञानेश्वर मराठे, अनुप जैन, बी.डी.केदार, गोरख देशमुख, महेंद्र तायडे, दिनेश पाटील, बाळासाहेब जाधव, नंदलाल महाजन, ऍड. विक्रम परिहार, ऍड. विक्की पाटील, पंकज पवार, भरत शिरसाठ, हेमराज भालेराव, विनोद चव्हाण, भरत महाजन, सागर ठाकरे, मनीष चौधरी, दिपक वाघमारे, विजय सोनवणे, उदय मोरे, देवानंद चव्हाण, प्रदीप पगारे, दिनेश चौधरी, अनिल चौधरी, सीताराम मराठे, धनराज पाटील, समाधान महाजन, गौरव तावडे, गणेश गुरव, आबासाहेब वाघ आदी मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    याप्रंसगी आलेल्या मान्यवरांचे स्वागत निलेश पवार यांनी तर, आभार महेंद्र तायडे यांनी व्यक्त केले.