जबरानजोत शेतकऱ्यांना पट्टे देण्यात यावे -वंचित बहुजन आघाडी धरणे आंदोलन

21

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.4जुलै):- ब्रम्ह्पुरी तालुक्यातील जबरानजोत आदिवासी व गैरआदिवासी शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे देण्यात यावे , झोपडपट्टी भागातील अतिक्रमण धारकांना घराचे पट्टे देण्यात यावे , व तालुक्यातील पुरपिडीत गावांतील कुटुंबांना सानुग्रह मदत तात्काळ करावी .या प्रश्नांना घेऊन मा .राजुभाऊ झोडे विदर्भ समन्वयक वंचित बहुजन आघाडी यांच्या नेत्रुत्वात तालुका ब्रम्ह्पुरी च्या वतीने 3 जुलै 2021 ला धरणे आंदोलन करण्यात आले .जबरानजोत शेतकऱ्यांच्या , झोपडपट्टी तील जनतेच्या व पुरपिडीत कुटुंबांच्या समस्यांवर मा.राजुभाऊ झोडे विदर्भ समन्वयक, मा.जयदीप खोब्रागडे जिल्हा महासचिव, सुभाषभाऊ थोरात शहर उपाध्यक्ष , डॉ प्रेमलाल मेश्राम जेष्ठनेते , सुखदेव प्रधान सर , मनीषा उमक म्याडम , अश्विन मेश्राम , हरिश्चंद्र चोले सर यांनी मार्गदर्शन केले.यामध्ये तीन पिढ्यांची जाचक अट रद्द करण्यात यावी.

वनहक्क कायद्यानुसार आदिवासी गैरआदिवासी शेतकऱ्यांना पट्टे देण्यात यावे , वनविभागाचा शेतकऱ्यांवरचा वाढता अन्याय बंद करण्यात यावा , ब्रम्ह्पुरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा तात्काळ निपटारा करण्यात यावा , वहिवाट झाल्याशिवाय अतिक्रमण धारकांच्या शेतात मूणारी टाकु नये , झोपडपट्टीत राहणाऱ्या अतिक्रमण धारकांना घरांचे पट्टे तात्काळ देण्यात यावे , तालुक्यातील पुरपिडीत गावांतील कुटुंबांना तात्काळ सानुग्रह मदत द्यावी अशा आशयाच्या मागन्या आंदोलनातून करण्यात आल्या.याविषयीचे निवेदन तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.मागण्या पूर्ण न झाल्यास तिव्र आंदोलनाचा इशारा सुध्दा पक्ष्याच्या वतीने देण्यात आला.

यावेळी लिलाधर वंजारी ता महासचिव , कमलेश मेश्राम , अरुण सुखदेवे , अश्व्जीत हुमने , नरेंद्र मेश्राम , अनिल कांबळे , डॉ विलास मैंद , डी एम रामटेके , सौ लिना रामटेके , शितल गायकवाड , प्रमिला पाटील , पध्मिनि धनविजय , जगदीश भषाखेत्रे , प्रभूदास लोखंडे , सत्यवान राऊत , आर बी मेश्राम सर , शैलेंद्र बारसागडे , गेडाम साहेब अध्यक्ष नागभीड, सूरज मेश्राम , शरद अंबादे, धीरूगोपाल धोंगडे सरपंच, सुरेश भैसारे सरपंच तसेच असंख्य पक्ष्याचे कार्यकर्ते, झोपडपट्टीधारक महिला , जब्रानजोत शेतकरी व पुरपिडीत गावांतील कुटुंबे उपस्थित होते.