पारनेर येथील बुद्ध विहाराच्या जागेवर झालेले अतिक्रमण काढून टाका अन्यथा तीव्र आंदोलन – मा. सचिन मेघडंबर

20

✒️नवनाथ पौळ(बीड,अंबाजोगाई विभाग प्रतिनिधी)मो-8080942185

बीड(दि.5जुलै):-पाटोदा तालुक्यातील पारनेर गावातील बुद्ध विहारा समोर गावातील एका इसमाने अतिक्रमण केले आहे सदरील आक्रमण लवकरात लवकर काढा नाहीतर आम्ही पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करू असं आशयाचे निवेदन नितीन इनकर व गावातील ग्रामस्थांनी दिला आहे.पारनेर गावात वीस ते पंचवीस वर्षापासून गावात जुने बुद्धविहार आहे या बुद्ध विहार च्या आवारातील मोकळ्या जागेत गावातील माजी उपसरपंच संतोष औटे यांनी अतिक्रमण केले आहे हे अतिक्रमण काढा म्हणून ग्रामस्थांनी वेळोवेळी ग्रामपंचायत व ग्रामसेवक आणि गटविकास अधिकारी यांना वेळोवेळी निवेदन दिले पण कसलीही दखल घेतली नाही.

त्यामुळे येणाऱ्या बारा तारखेला पंचायत कार्यालय समोर वंचित बहुजन आघाडी व पारनेर गावातील सर्व समाज बांधव आमरण उपोषण करणार आहेत असे निवेदन दिले हे निवेदन देताना गावातील प्रतिष्ठित नागरिक व वंचित बहुजन आघाडि बीड जिल्हा महासचिव सचिन मेघडंबर दिपक थोरात संजय यादव मिलिंद देवडे किशोर यादव खंडू यादव यांच्या सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.