अन्नतंत्र महाविद्यालय आष्टी येथे वृक्षारोपण करून कृषी दिन साजरा

    46

    ✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

    आष्टी(दि.5जुलै):-१ जुलै २०२१ रोजी हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांचा जन्म दिवस महाराष्ट्रात दरवर्षी ‘कृषीदिन’ म्हणून साजरा केला जातो.आष्टी-पाटोदा-शिरूर मतदार संघाचे माजी आमदार व शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ,आनंद चॅरिटेबल संस्था आष्टी चे संस्थापक अध्यक्ष भीमसेन धोंडे यांनी शाश्वत शेतीचे उद्दिष्ट समोर ठेवून शैक्षणिक संस्थेच्या प्रक्षेत्रावर १,११,१११ बांबू वृक्षाची रोपे लागवड करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.

    यापैकी अन्नतंत्र महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर ४६ हजार रोपाची लागवड करण्यात येणार आहे.यावेळी संस्थेचे जेष्ठ संचालक विठ्ठल (आण्णा) बनसोडे,संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ.डी.बी.राऊत,प्रा.शिवदास विधाते,संजय शेंडे,माऊली बोडखे,वन विभागाचे वनपाल बाबासाहेब मोहळकर,डॉ.चंद्रकांत गोसावी,पत्रकार उत्तम बोडखे,अन्नतंत्र महाविद्यालयाचे प्राचार्य साईनाथ मोहळकर,कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम अडसूळ,फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य सुनील कोल्हे तसेच अन्‍नतंत्र महाविद्यालयातील प्रा.पवार एम.पी,प्रा.कडभणे व्ही.एस,प्रा.अडसरे ए.डी.,प्रा,शिंदे आय.एन ,प्रा.वडमारे व्ही.बी,प्रा.चित्ते ए.एस,प्रा.राऊत डी.डी,प्रा.भोपळे एस.जी,अनारसे डी.एम,राऊत ए,एच,पठाण एम.बी.इत्यादी उपस्थित होते.