राष्ट्रवादी काँग्रेस युवक शहराध्यक्ष पदी अमरनाथ कांबळे यांची निवड

24

✒️अशोक हाके(बिलोली,ता.प्र.)मो.नं.9970631332

बिलोली(दि.5जुलै):- येथील पंचायत समिती सभापती निवसस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक घेण्यात आली,या बैठकीमध्ये नव्याने पक्ष प्रवेश केलेल्या कार्यकृत्यांचा सत्कार व पक्षबांधणीसाठी अनेक पदावर नवीन नियुक्त्या करण्यात आल्या,त्यामध्ये कुंडलवाडी युवक शहराध्यक्ष पदी अमरनाथ कांबळे यांची निवड करण्यात आली.

यावेळी जिल्हा चिटणीस गोसोद्दीन खुरेशी,जिल्हाचिटणीस रवी शेट्टी,तालुकाध्यक्ष नागनाथ पाटील सावळीकर, माजी जिल्हापरिषद सदस्य सुभाष गायकवाड,माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम हायगले,युवक तालुका अध्यक्ष रणजित पाटील,सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्ष गंगाधर प्रचंड,माजी सभापती व्यंकट पांडवे,तालुका कार्याध्यक्ष नागनाथ पाटील खेळगे,कुंडलवाडी शहराध्यक्ष नरसिंग जिठ्ठावार उपाध्यक्ष शेख ईशु,आदीसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.हि निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्या देण्यात येत आहेत.