लाच घेताना नांदगाव तालुक्यातील तलाठी यास एसीबीने रंगेहात केले जेरबंद

21

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नाशिक(दि.6जुलै):-नांदगाव तालुक्यातील टाकळी बुद्रुक येथील तलाठी विलास विठ्ठल बागुल या सहा हजार रुपयाची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. अँटी करप्शन ब्युरो एसीबी लावलेल्या सापळ्यात बागुल हा रंगेहात पकडला गेला आहे. शेत जमिनीच्या खाते वाटप यांची नोंद सातबारा उतारा वर करण्यासाठी बागूल यांनी सहा हजार रुपयाची लाचेची मागणी केली होती. यासंदर्भात एसीबी कडे तक्रार करण्यात आली.

त्यानंतर पथकाने सापळा रचला नांदगाव तहसील कार्यालयाजवळ सुरज हॉटेलमध्ये सहा हजार रुपयाची लाच घेताना बागुल हा रंगेहात पकडला गेला. याप्रकरणी एसीबी बागुल विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. याप्रकरणी एसीबीच्या वतीने पुढील तपास केला जात आहे. लाच घेणे आणि देणे हा गुन्हा आहे प्रकार घडत असल्यास एसीबीच्या 10 64 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आव्हान एसीबी च्या वतीने करण्यात आले