माणदेशी फौंडेशन आणि बेल एअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त लसीकरण मोहिमेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

23

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.8जुलै):-येथील माणदेशी फौंडेशन आणि बेल एअर हॉस्पिटल ,पाचगणी यांच्या संयुक्त विध्यमाने म्हसवड व परिसरातील महिलांसाठी काल पासून मोफत लसीकरणाला सुरुवात झाली या लसीकरण मोहिमेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.दि.7 जुलै ते 10 जुलै या दरम्यानं माणदेशी फौंडेशन आणी बेल एअर हॉस्पिटल ,पाचगणी यांच्या संयुक्त विध्यमाने महिलांसाठी मोफत लसीकरण म्हसवड येथील माणदेशी फौंडेशनच्या मुख्य कार्यालयात चालू असून काल पहिल्याच दिवशी विक्रमी सातशे महिलांचे लसीकरण करणेत आले.अजून लसीकरणासाठीचे तीन दिवस बाकी असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांचा प्रतिसाद पाहता माणदेशी फौंडेशनने आधी तीन हजार लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले होते ते वाढवून आता सध्यातरी सहा हजार लसीकरण करण्याचे ठरविले आहे.

यावेळी लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद देतानाच येणाऱ्या महिला ह्या माणदेशी फौंडेशन च्या अध्यक्षा श्रीमती चेतना सिन्हा आणि बेल एअर हॉस्पिटल,पाचगणी याचे आभार मानताना आणि धन्यवाद देताना दिसत आहेत.
या लसीकरणासाठी सध्या म्हसवड शहरातील महिलांसाठी माणदेशी फौंडेशनचे मुख्य कार्यालय येथे आणि ग्रामीण परिसरातील महिलांसाठी मेघा सिटी येथे लसीकरण केंद चालू आहे.

यावेळी फौंडेशनच्या लसीकरण केंद्रावरती लस घेतलेल्या महिलाना वृक्ष वाटप करणेत येत आहे. आज कोरोना रुग्णां ना जादा प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासत होती आणि त्याची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवली या उद्देशानेच भविष्यात अशी अडचण निर्माण होऊ नये आणि नैसर्गिक ऑक्सिजन मिळावा यासाठीचे वाटप करण्यात आल्याचे फौंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.कुलकर्णी यांनी सांगितले त्यापुढे म्हणाल्या म्हसवड व परिसरातील जास्तीत जास्त ,महिलांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा लसीकरणाचे उद्दिष्ट वाढविले आहे.माणदेशी फाउंडेशनच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांचे लसीकरण करणे हेच आमचे ध्येय आहे.