डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने अंतर्गत खटाव तालुक्यावर अन्याय- गणेश भोसले

    44

    ?141 पैकी 137 गावात योजना नाही?

    ✒️खटाव प्रतिनिधी(नितीन राजे)

    सातारा(दि.8जुलै):- जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील गोरगरीब मागासवर्गीय(S C) प्रवर्गातील शेतकऱ्यांवर अन्याय होत असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने अंतर्गत सरसकट मागासवर्गीय शेतकऱ्यांना सिंचन विहीर योजनेचा लाभ देण्यात येत होता. त्यामुळे मागासवर्गी शेतकऱ्यांचे जीवनमान योजनेतून सुधारत होते. परंतु शासनाच्या वरिष्ठ भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा सातारा पत्र जाक्रवभुवै/मुस्लिम/सा/ता/डॉ.बा.आं.कृ.स्वा.यो./401/21दि.2-6-2021 नुसार खटाव तालुक्यातील 141 गावांपैकी 137 गावे यामध्ये या योजनेचा लाभ देण्यात येत नाही. या योजनेमध्ये सुधारणा करण्यात यावी. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नेते गणेश भोसले जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.

    मागासवर्गीय समाजातील लोकांवर जाणीवपूर्वक अन्याय करणाऱ्या करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी. योजनेमुळे मागासवर्गीयांचा लाखो करोडो रुपयांचा निधी अखर्चित राहणार आहे‌. त्यामुळे खटाव तालुक्यातील सर्व मागासवर्गीय (S C) शेतकऱ्यांना सरसकट या योजनेचा लाभ देण्यात यावा. तसेच तालुक्यावर होणारा अन्याय दूर करावा.

    या योजनेमुळे मागासवर्गीयांना पाणी साठवून ठेवण्याची जागा उपलब्ध होईल. दुष्काळाची झळा सोसत असणारा खटाव तालुका या योजनेमुळे जलमय होईल. या विषयावर योग्य तो निर्णय घेऊन न्याय द्यावा. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. हे निवेदन देताना रिपाईचे खटाव तालुक्यातील सर्व पदाधिकारी ता. कार्याध्यक्ष मा. गणेश भोसले, जेष्ठ जिल्हा नेते अजित नलावडे, महेंद्र माने,संदीप काळे,रवी इंजे, सागर जावळे, अजित कंठे, दत्ता शिंदे, बबन खैरमोडे, ॲड‌. शाहनवाज काझी,ग्रा.सदस्य सचिन उमपे, अभिजित बोकडे, शरद भोसले होते.