वीस वर्षाच्या प्रतिकक्षेनंतर दुगावकराना मिळाले पिण्याचे शाश्वत पाणी

28

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)

बिलोली(दि.9जुलै):-तालुक्यातील मौजे दुगाव हे गाव गोदावरी नदी पासून तीन किलोमीटर अंतरावर असून गावाला नदीवरून जुनी पाणी पुरवठा योजना करण्यात आली होती मात्र ती फार काळ चालू शकली नाही, गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी पंधरा वर्षापासून बोअर अधिग्रहण करून पाणीपुरवठा केला जात होता. गावातील तत्कालीन सरपंच केदार पाटील साळुंके यांनी वीस वर्षापासून शाश्वत पाणी मिळवण्यासाठी प्रयत्न चालू केला मात्र कधी विहीर कोरडी गेली तर कधी बोअर कोरडे गेले. जुनी योजना दुरुस्त केली मात्र त्यात काही गावाला पाणीपुरवठा झालाच नाही ग्रामपंचायतीने नवीन योजनेचा प्रस्ताव दिला आणि ती मंजूर करून नव्याने योजना कार्यान्वित करण्यात आली.

त्या विहिरीस भरपूर पाणी लागल्याने दुगावकरांना वीस वर्षाच्या अथक प्रयत्नाने शाश्वत पाणी मिळालेले असून त्याचे लोकार्पण प्रदेश युवक काँग्रेसचे माजी सरचिटणीस तथा दुगाव चे माजी सरपंच केदार पाटील साळुंके यांच्या हस्ते लोकार्पण करून पहिल्यांदा त्यांच्या हस्ते ग्रामदैवतेला जल वाहण्यात आले आले.
दुगाव हे गाव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी सरचिटणीस केदार पाटील साळुंके यांचे गाव ज्यांना गावच्या लोकांनी 2005 साली सरपंच पदावर निवडून दिले. त्यानंतर त्यांच्या ताब्यात चार वेळा ग्रामपंचायतही दिली. त्यांनी गावचा कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न सोडवता यावा त्यासाठी त्यांनी सरपंच असतानापासून प्रयत्न चालू केले. गावामध्ये गावच्या आजूबाजूला अनेक बोअर घेतले त्यास कायमस्वरूपी पाणीपुरवठा होईल एवढं पाणी लागले नाही, गावाची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने पाणीपुरवठा ही जास्तीचा लागणार त्यासाठी गावाला तात्पुरती सोय म्हणून चार खाजगी बोअर अधिग्रहण केले व गावाला त्याद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होते. कायमस्वरूपी पाणीपुरवठा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने मागील वीस वर्षापासून सतत प्रयत्न करण्यात येत होते.

 त्यात गोदावरी नदी वरून असलेली जुनी योजना चालू करण्यासाठी प्रयत्न केले, त्यात काही यश आले नाही. हुसा नाल्यावर अनेक बोअर घेतले, तेही फेल गेले. गावचा कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामपंचायतीने शासनाकडे नवीन योजनेचा प्रस्ताव दाखल करून तो मंजूर करून घेतला. त्याअंतर्गत हूसा नाल्यावर विहीर खोदकाम केली मात्र तीही कोरडी गेली. त्यानंतर वरिष्ठ भूजल सर्वेक्षण अधिकारी व गावकऱ्यांच्या वतीने हनुमंत गंगाधर साळुंके यांच्या शेतात ईकळीमोर शिवारात दुसऱ्यांदा विहीर खोदकाम केले .त्यास भरमसाठ पाणी लागले असून वीस वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर केदार पाटील साळुंके यांच्या प्रयत्नाने दुगावकराना शाश्वत पाणी पुरवठा योजना करण्यात आली. त्या योजनेचे लोकार्पण महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी सरचिटणीस केदार पाटील साळुंके यांच्या हस्ते करून पहिल्यांदा ग्रामदेवतेला पाणी वाहण्यात आले. प्रसंगी उद्योजक माधव डोम्पले, कॉन्ट्रॅक्टर सुधीर जाधव, उपअभियंता भोजराज साहेब,शाखा अभियंता गिरी साहेब ,विठ्ठलवार साहेब, सूर्यकांत पाटील जाधव, मारुती पाटील साळुंखे, हनुमंत पाटील कदम, माजी सरपंच प्रल्हाद भंडारे, प्रल्हाद रायकवाड ग्रामपंचायत सदस्य दिगंबर साळुंखे ,अशोक कदम ,हनुमंत साळुंखे ,संजय पुयड, बळीराम साळुंके, शिवाजी पुयड, बाबू साळुंके, हनुमंत शिंदे ,रतन खैरगावे, आनंद शेळके , माधव साळुंके, परभात साळुंखे ,श्रीपत साळुंखे सह आदी उपस्थित होते .माजी सरपंच प्रल्हाद रायकवाड पोलीस पाटील नीलकंठ पाटील कदम ,संजय पाटील जाधव ,बळवंत पाटील कदम, माजी उपसरपंच कोंडीबा पाटील शिंदे, सूर्यकांत पाटील जाधव विश्वनाथ पाटील साळुंके हनुमंत पाटील कदम ,रावसाहेब भंडारे, माधव पाटील शिंदे, यांच्या काळातील ग्रामपंचायतच्या प्रयत्नाने दुगावकरांना शाश्वत पिण्याचे पाणी मिळालेले आहे.