डॉक्टर भारती पवार यांच्या रूपाने नाशिकच्या इतिहासात जिल्ह्याला पहिल्यांदा केंद्रीय मंत्री पद !

49

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

दिंडोरी(दि.9जुलै):- लोकसभा मतदार संघाच्या डॉक्टर भारती पवार यांच्या रूपाने नाशिक जिल्ह्याला पहिल्यांदा केंद्रीय मंत्री पद मिळाले आहे या अगोदर नाशिक मधून लोकसभेवर निवडून गेले कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांना संरक्षण मंत्री पद मिळाले होते पण ते नाशिकचे रहिवासी नव्हते त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या खासदार डॉक्टर भारती पवार यांच्याद्वारे नाशिक जिल्ह्याला व नाशिकच्या इतिहासात पहिल्यांदाच केंद्रीय पद लाभली आहे.

डॉक्टर भारती पवार या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून निवडून गेल्या या अगोदर त्यांनी याच मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षातर्फे निवडणूक लढवली होती व त्यात त्यांचा पराभव झाला पण त्यांनी चिकाटी सोडली नाही त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला विविध आंदोलने केली पण त्यांना राष्ट्रवादीने 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत संधी न दिल्यामुळे त्या भाजपा मध्ये गेल्या या निवडणुकीत विजयी झाल्या निवडून आल्यानंतर त्यांनी कामाचा झपाटा चालू ठेवला व त्यांना त्यांच्या कामाची संधी मिळाली