आमचे शिक्षक – आमचा अभिमान …..

24

🔹सुवर्णमहोत्सवी शाळेच्या वतीने पी.डी.पाटील यांचा सन्मान……

✒️धरणगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

धरणगाव(दि.10जुलै):- सुवर्णमहोत्सवी शाळा – महात्मा फुले हायस्कूल,धरणगांव शाळेतील उपक्रमशिल शिक्षक पी.डी.पाटील यांची सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय भरीव व वैशिष्ट्यपूर्ण कार्याची दखल घेऊन “राज्यस्तरीय महात्मा जोतीराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार ” मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.याप्रसंगी सुवर्णमहोत्सवी शाळेच्या मुख्याध्यापिका पी. आर.सोनवणे, जेष्ठ शिक्षीका एम.के.कापडणे व पर्यवेक्षक जे.एस.पवार व संपूर्ण स्टाफ च्या वतीने शाल – पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. व वरीष्ठांकडून शाबासकीची थाप देण्यात आली. आमचे शिक्षक – आमचा अभिमान आहेत.

त्यांनी अशीच प्रगती करावी व शाळेचे नाव मोठे करावे असे प्रतिपादन मुख्याध्यापक पी.आर. सोनवणे यांनी केले
महात्मा जोतीराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार मिळणे ही माझ्या कामाची पावती आहे. हा पुरस्कार मला बळ व ऊर्जा देणारा आहे आणि माझ्या मुख्याध्यापकांनी व सहकारी शिक्षक बंधू-भगिनींनी माझा सन्मान केला हे माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. असे प्रतिपादन पुरस्कारार्थी पी. डी.पाटील यांनी केले.याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका पी.आर. सोनवणे, ज्येष्ठ शिक्षिका एम. के. कापडणे, पर्यवेक्षक जे.एस.पवार व संपूर्ण शिक्षक बंधू – भगिनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.