महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या सहाय्यक सचिव पदी सागर पाटील यांची निवड

19

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.10जुलै):-महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत तांदुळवाडी (ता. वाळवा, जि. सांगली) गावचे सुपुत्र सागर पापासाहेब पाटील यांची ‘सहाय्यक सचिव’ महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, गट-अ या राजपत्रित पदावर निवड झाली.सागर यांनी तांदुळवाडी जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यम शाळेतून शिक्षण घेतले असून पुण्यातील सिंहगड कॉलेजमधून मेकॅनिकल मध्ये अभियांत्रिकी पदवी मिळवलेली आहे. डिझाईन इंजिनिअरिंग मध्ये पदवीत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला.

प्रदीर्घ कृषी व शैक्षणिक असा मिश्र वारसा असणाऱ्या कुटुंबातील सागर आपल्या यशाचे श्रेय आई वडील, काका काकी, भावंडे, तांदुळवाडी गावचे ग्रामस्थ व मित्रपरिवारास देतात. वारंवार मिळणाऱ्या अपयशाचा धैर्याने सामना करत त्यांनी हे यश खेचून आणल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या यशावर न थांबता भविष्यात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करून आय ए एस होण्याचे त्यांचे स्वप्न असल्याचे सागर यांनी व्यक्त केले.