पेट्रोल, डिझेल,गॅस दरवाढी विरोधात काँग्रेसची सायकल रॅली

    49

    ?डॉ.सतीशभाऊ वारजूकर जि. प.गट नेते चंद्रपूर यांच्या नेतृत्वात

    ✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

    चिमूर(दि.11जुलै):-देशभरात पेट्रोल व डिझेलसह अन्य जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. केंद्र सरकार याकडे दुर्लक्ष करित आहे. काँग्रेसच्या वतीने आतापर्यंत अनेक आंदोलने करण्यात आले. तरीही निर्ढावलेल्या केंद्र सरकारला जाग आली नाही. दिवसेंदिवस अधिकच जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढतच आहेत. त्यामुळे केंद्रातील भाजपा सरकारचा निषेध करण्यासोबतच जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करण्यात यावे, याकरिता तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सायकल रॅली काढून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व जि. प.गटनेता डॉ.सतिषभाऊ वारजूकर यांनी केले.

    मागील काही महिन्यांपासून देशात सातत्याने पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर आदी जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत आहे. इतिहासात पहिल्यांदाच पेट्रोल व डिझेलचे दर शतक पार केले आहे. याचा परिणाम इतर व्यवसायावर झाला. त्यामुळे अनेक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. कोरोनाच्या काळात अनेकांचे रोजगार हिरावले गेले आहेत, यातच महागाई वाढली असल्याने सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. डिझेल, पेट्रोल दरवाढीमुळे दळणवळणाचे दर वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांना कमालीचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. याचा निषेध म्हणून रविवारी ( ११जुलै) वारजूकर भवन (कांग्रेस कार्यलय )पासून ते हजारे पेट्रोल पंप पर्यंत काँग्रेस कमिटीने सायकल रॅली काढून केंद्र सरकारचा निषेध केला.

    या आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरूद्ध घोषणाबाजी करत त्वरित दरवाढ मागे घेण्यात यावी अशी मागणी केली या आंदोलनात चिमूर तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजयजी घुटके,चंद्रपूर जिल्हा कांग्रेस कमिटी सरचिटणीस विजय पाटील गावंडे, चिमूर पंचायत समिती उपसभापती रोषणभाऊ ढोक,तालुका उपाध्यक्ष विजयजी डांबरे,उपाध्यक्ष राजू चौधरी, युवक कांग्रेस अध्यक्ष प्रशांत डवले,पप्पू शेख,संदीप कावरे,नितीन कटारे,विलास मोहिणकर,राणीताई थुटे,अभिलाषा शीरभये, ममताताई भिमटे,दिक्षाताई भगत, नाजेमा पठाण,रामदास चौधरी,प्रवीण जीवतोडे,शुभम पारखी,प्रमोद धाबेकर, पवन बंडे,अमित मेश्राम,पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते._