सतीश राठोड यांची गोर सेना जिवती तालुका अध्यक्ष पदी निवड

16

✒️शब्बीर सय्यद जहागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-9623896574

जिवती(दि.11जुलै):-समाजासाठी सामाजिक चळवळ उभी करून समाजाच्या अडचणी दूर करण्यासाठी जी चळवळ चालू केली आहे ती म्हणजे गोर सेना. ही चळवळ देशभरात काम करत असून या चळवळीचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश भाऊ चव्हाण यांनी प्रत्येक जिल्ह्यात तसेच तालुक्यात आपली शाखा स्थापन केली आहे.

दिनांक १० जुलै रोजी जिवती तालुक्यातील कार्यकारणी जाहीर करण्यात आली यावेळी जिवती तालुका अध्यक्ष सतीश राठोड यांची निवड करण्यात आली तसेच तालुका उपाध्यक्ष सुधाकर जाधव यांची निवड जिल्हा अध्यक्ष सुभाष राठोड यांच्या हस्ते सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

यावेळी जी.व्ही. पवार सर, विनायक राठोड सर,उमेश आडे, प्रभाकर पवार, प्रकाश पवार, कैलास राठोड, सुनील राठोड, विकास चव्हाण,आभास राठोड च्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली तालुका अध्यक्ष सतिश राठोड यांच्या निवडीबद्दल अनेकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.