तरुण गेले अंमली पदार्थाच्या आहारी,पोलिसांनी केला गांजा जप्त

29

✒️मो.इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.११जुलै):-शहरात अंमली पदार्थाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून अनेक तरुण तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी याचे व्यसनाधीन झाले आहेत.शहरात अवैध दारू विक्रीसह अंमली पदार्थाचा सुळसुळाट आहे.बसस्टैंड, रेल्वेस्टेशन,नुतन शाळा ग्राउंड असे अनेक ठिकाणी रात्री तरुण मुले अंमली पदार्थाचे सेवन करतांना दिसुन येतात.बसस्टैंडला लागुन असलेल्या टाका ग्राउंड परिसरातील झोपड़पट्टी भागात रात्री अवैध धंदे बिनबोभाट सुरु असतात.काल दिनांक १० जुलै रोजी सायंकाळी गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पोहवा, विवेक बनसोड यांना मिळालेल्या माहितीवरुन अंकुश मेश्राम(२८) रा. महात्मा फुले वार्ड हिंगणघाट याला मोटारसायकलने अंमली पदार्थ गांजा घेऊन शहरात येत असतांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

सपोनि प्रशांत पाटनकर तसेच पोउपनि अमोल लगड यांनी गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो.हवा. विवेक बनसोड व त्यांचे पथकासह राष्ट्रीय महामार्गावरील कलोडे चौक येथे नाकेबंदी केली.
अंकुश अरुण मेश्राम हा मोटारसायकलने गांज्याची वाहतुक करीत असतांना रंगेहात सापडला, त्याचे ताब्यातुन एका पिवळे रंगाचे पिशवी मध्ये ५५७ म गंजा किंमत ५ हजार ५७० रूपये तसेच हिरोहोंडा स्लेंडर मोटरसायकल क्रमांक एम.एच. ३२-ए.एम.८७९२, एक विवो कंपनीचा मोबाईल तसेच नगदी रक्कम ९५० रूपये असा एकुण ६६ हजार ५२० रूपयांचा मुददेमाल जप्त करून आरोपी विरुद्ध हिंगणघाट पोलिसांत अप. क्रमांक ५८६/२०२१ कलम २०(ब) स.डी.पी.एस. ऍक्ट सा कलम ३६८१, १३०/१७७ मोवाका अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला. आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास सपोनि प्रशांत पाटनकर करीत आहेत.

सदरची कार्यवाही प्रशांत होळकर पोलीस अधिक्षक वर्धा, अपर पोलीस अधिक्षक यशवंत सोलंकी, उप विभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम,ठाणेदार संपत चव्हाण याचे मार्गदर्शनात पो.उप.स.पो.नि.प्रशांत पाटणकर, पोउपनि अमोल लगड, पोहवा. विवेक बनसोड, पंकज घोडे, सुहास चांदोरे, प्रशांत वाटखेडे, उमेश बेले, विरेन्द्र कांबळे, संदीप बदकी, विजय काळे यांनी केली.