कै. बळवंतरावजी धर्माधिकारी यांची 32 वी पुण्यतिथी साजरी

21

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)

नांदेड(दि.13जुलै):- – बरबडा येथील जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बरबडा येथे संस्थेचे माजी अध्यक्ष कै बळवंतरावजी धर्माधिकारी यांची 32 वी पुण्यतिथी शाळेत साजरी करण्यात आली.या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणुन संचालक तथा माजी प्राचार्य श्री व्ही टी सुरेवाड सर प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष तथा प्राचार्य दिलीपराव धर्माधिकारी, उपाध्यक्ष सदाशिवराव धर्माधिकारी, संचालक देविदासराव नेरलेवाड, इरना कंडापले,शिवाजीराव धर्माधिकारी हे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व मान्यवरांच्या व शाळेतील सर्व कर्मचारी यांच्या हस्ते कै बळवंतरावजी धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर संतोष पचलिंग सर,एन एम तिप्पलवाड सर, तगडपल्लेवार सर, पर्येंवेक्षक गणेश बडूरे सर, शिंदे सर यांनी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली व त्यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला.

तद्नंतर शाळेचे अध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी यांनी त्यांच्या बालपणच्या व त्यांच्या सोबतच्या आठवणी ला उजाळा देत त्यांचे सामजिक व राजकिय कार्य कथित केले. सदाशिवराव धर्माधिकारी यांनी बळवंतरावानी केलेल्या सामाजिक कार्याचा आलेख सर्वांसमोर मांडला. सुरेवाड सर यांनी त्यांच्या सोबत केलेले कार्य व शालेय कामकाज करताना त्यानी दिलेली साथ व त्यांचं सहकार्य मी कदापि विसरू शकणार नाही.

आणि त्यानी केलेलं निःस्वार्थ कार्य व त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून जीवन व्यतीत केलं तर त्यांना खरी श्रद्धांजली अर्पण केल्यासारखे होईल.असे त्यानी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा हंबर्डे सर यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा मुदखेडे यांनी मांडले.