बळीराम शेळके शिवसेना समन्वयक जिवती तालुका पदी नियुक्ती

21

✒️शब्बीर सय्यद जहागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-9623896574

जिवती(दि.14जुलै):- हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना पक्षप्रमुख मा.उध्दवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार व शिवसेना नेते खासदार गजानन किर्तीकर यांच्या सुचनेनुसार चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत कदम यांनी जिवती तालुक्यातील येरमी येसापूर ग्रामपंचायतचे उपसरपंच बळीराम शेळके यांची जिवती तालुका शिवसेना समन्वयक पदी नियुक्ती केली आहे.

नवनियुक्त तालुका समन्वयक पक्षाचा प्रसार व प्रचार जोमाने करतील अशी अपेक्षा यावेळी करण्यात आली असून नियुक्ती पत्र देताना संदिप गिर्हे शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर, संदिप करपे शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजुरा विधानसभा, बबन उरकुडे शिवसेना समन्वयक राजुरा विधानसभा, लक्ष्मण उर्फ भुरु मुंडे शिवसेना तालुकाप्रमुख जिवती,सह जिल्ह्यातील इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते