वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

23

✒️विशेष प्रतिनिधी(समाधान गायकवाड)

हडपसर-पुणे(दि:-१३जुलै):- वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष मा.अनिल आण्णा जाधव यांच्या वाढदिवस निमित्ताने कोथरुड विधानसभा मतदारसंघ पदाधिकारी यांच्या वतीने वाढदिवसाचे औचित्य साधून बोधीवृक्षाचे रोपन अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.

वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते विशाल लोंढे यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष अनिल आण्णा जाधव यांच्या हस्ते व पुणे शहर महासचिव अँड अरविंद तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली धम्माकुंर बौद्ध विहार पाषाण या ठिकाणी व्रक्षारोपण संपन्न झाला.

यावेळी विशाल सरवदे, विकास भेगडे, सतिश रणवरे, विशाल लोंढे, करणं घटकांबळे, प्रविण सोनवणे, अजय कांबळे, अजय ताम्हणे, भगत सुंदरसे, विजय प्रधान, दिपक कांबळे, नारायण जाधव, सुहास जाधव, प्रल्हाद निकाळजे, प्रशांत वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत व्रक्षारोपनाचा कार्यक्रम संपन्न झाला.