शिवशंभु छावा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा.भरत शेठ पवळे यांच्या वाढदिवसा निमित्त रुग्णांना फळ वाटप

20

🔸आरोग्य कर्मचारी यांचा सत्कार

✒️मनोहर गोरगल्ले(खेड-राजगुरू नगर प्रतिनिधी)मो:-97672 14634

खेड(दि.14जुलै):- शिवशंभु छावा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री भरत शेठ पवळे यांच्या वाढदिवसा निमित्त चांडोली (राजगुरू नगर-खेड) ग्रामीण रुग्णालय येथे सर्व कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस यांचा कोरोना कोविड योद्धा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला तसेच रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.

त्यानिमित्त मांजरेवाडी येथे वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला. या निमित्ताने शिवशंभू छावा प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्य सचिव मा.मनोहर गोरगल्ले, मा.संध्याताई शिंदे,आदित्यभाऊ कुंचाळे, सचिनभाऊ राक्षे, दत्ताभाऊ टाकळकर ,विकास शेठ शितोळे, बबनराव खेसे, निमगावचे सरपंच बबनराव शिंदे, राहुलशेठ काकडे, काळुराम वायकर, स्वप्नील पर्हाड, अनिलशेठ मिसर व डाॕक्टर वाडेकर, डाॕक्टर काजळे, डाॕक्टर टाकळकर व चांडोली रुग्नालयचे डाॕक्टर व सर्व कर्मचारी पदाधिकारी उपस्थित होते.