वंचित बहुजन आघाडी च्या मुळावा, शांतीनगर च्या शाखा अध्यक्ष पदी सुधाकर लोखंडे तर सुकळी (न) च्या शाखा अध्यक्ष अंबादास पाईकराव यांची निवड

20

✒️सिध्दार्थ दिवेकर(तालुका प्रतिनिधी,उमरखेड)मो:-9823995466

उमरखेड(दि.15जुलै):-तहसील अंतर्गत येणाऱ्या मुळावा या गावांमध्ये बुधवार दि. 14 जुलै 2021 रोजी संतोष जोगदंडे तालुका अध्यक्ष (वं ब आ,उमरखेड)यांच्या अध्यक्षतेखाली वंचित बहुजन आघाडी ची शाखा बांधणी करण्यात आली यामध्ये मुळावा शांतीनगर चे शाखा अध्यक्ष पदी सुधाकर लोखंडे यांची निवड करण्यात आली व उपाध्यक्ष पदी मारुती बोडके तसेच काजिम मुल्लाजी व सचिव पदी अमोल कांबळे, कोषाध्यक्ष अश्वजीत गायकवाड तर सहसचिव पदी राजरत्न लोखंडे यांची निवड करण्यात आली यावेळेस प्रमुख उपस्थितीत राजुभाऊ दाभाडे व अविनाश दिपके हे होते यावेळेस दादाराव चौरे, महेंद्र कांबळे, राजरत्न खंडागळे, आनंद कांबळे, शेख सद्दाम, राजकिरण खडसे, धीरज खडसे, आकाश खडसे, आदी उपस्थित होते.

त्याचबरोबर डिके दामोदर (वं ब आ महासचिव यवतमाळ) यांच्या अध्यक्षतेखाली व संतोष जोगदंडे यांच्या उपस्थितीमध्ये सुकळी(न) येथील शाखा बांधणी करण्यात आली यामध्ये शाखा अध्यक्ष पदी अंबादास पाईकराव, उपाध्यक्षपदी दिलीप पाईकराव आणि रामदास दिंडाळकर तर सल्लागार पदी मिलिंद पाईकराव तर सचिव पदी केरबा मात्रे, सहसचिव पदी आकाश कांबळे कोषाध्यक्ष पदी सिद्धार्थ कांबळे संघटक पदी शिलानंद लोखंडे, यांची निवड करण्यात आली यावेळेस किरण खंडागळे,मंगेश सुतारे,गौतम कांबळे, प्रदिप पाईकराव, समाधान पाईकराव, वैभल पाईकराव, अनिल गडदणे,राजेश गडदणे, प्रविण कांबळे,राहुल सा.पाईकराव, धम्मप्रकाश पाईकराव, ज्ञानेश्वर विलास जाधव, शंकर मारोतराव कांबळे, नागोराव चह्वाण,भगवान मारोती कांबळे,पंकज भारत पाईकराव, गजानन मारोती कांबळे, किरण खंडागळे,वैभल पाईकराव आदी नागरिक उपस्थित होते.