राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लिगल सेलचे दौंड तालुका अध्यक्षपदी अॅड. उदय फडतरे-देशमुख यांची नियुक्ती

28

✒️दौंड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

दौंड(दि.15जुलै):- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लिगल सेलचे दौंड तालुका अध्यक्षपदी अॅड. उदय फडतरे-देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच त्यांचे सोबत अॅड.कावेरी पवार- गुरसळ यांची पुणे जिल्हा राष्ट्रवादी लिगल सेलच्या संघटक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांचे नियुक्तीचे पत्र पुणे जिल्हा राष्ट्रवादी लिगल सेलचे अध्यक्ष अॅड. दिलिपराव करंडे साहेब यांच्या हस्ते दौंड तालुका दिवाणी व फौजदारी न्यायालयातील वकिल संघटनेच्या सभागृहात देण्यात आले.

यावेळी उपस्थितमध्ये दौंड तालुका वकिल संघटनेचे अॅड.एन.जी जाधव,अॅड. माधव आवचर व दौड तालुका बार असोसिएशनचे अनेक पुरूष व महिला वकिल उपस्थित होते. तसेच यावेळी उपस्थितांमध्ये राष्ट्रवादी लिगल सेलचे पुणे जिल्हा सरचिटणीस अॅड. दिपक संभाजी चौधरी पाटील.अॅड. देवीदास शिंदे पाटील हे उपस्थित होते.