हणेगाव विभागात जोरदार पावसामुळे अनेक हेक्टरमधील पिके गेली पाण्याखाली

31

🔹शेतकरी सापडला संकटात

✒️तालुका प्रतिनीधी(महादेव उप्पे)मो:-९४०४६४२४१७

हणेगाव(दि.१८जुलै):-हणेगाव व हणेगाव परिसरात दिनांक 18 रोज रविवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे हणेगाव खुतमापूर,कोकलगाव,भुतणहिपरगा,रमतापूर,अशा अनेक गावांत झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्व शेत जलमय झाल्याचे चित्र दिसून आले.अगोदरच कोरोनाच्या संकटात सापडलेला शेतकरी हा कसाबसा स्वताला सावरत सावकाराकडे बाकी ‌काढून दागिने गहाण ठेवून कर्ज काढून खत बी बियाणे घेऊन पेरणी केली.

खरी पण पुन्हा मध्येच पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागल्यामुळे शेतकरी हा खुपच डबघाईस आला आहे त्यातच रविवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे हणेगाव खुतमापूर, कोकलगाव ,रमतापूर, भूतनहिपरगा,कामाजीवाडी, अशा अनेक गावच्या शेतात पाण्यामुळे पिकाचे पूर्ण नुकसान झाल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.

तरी शासनाने याकडे लक्ष देऊन शेतकर्‍यांना दिलासा द्यावा अशी चर्चा या विभागात होत आहे तर खुतमापूर येथील निवृत्ती माधव वाडीकर दत्तात्रय माणिकराव वाडीकर गजानन सोपानराव पाटील विठ्ठल कांबळे सतीश लक्ष्मण वाडीकर यांच्या शेतातील पिके पुर्णपणे पाण्यात असल्याचे खुतमापुर येथील शेतकरी निवृती माधवराव वाडीकर यांनी सांगितले.