राज्यपाल मा.श्री.भगतसिंह कोश्यारी यांच्या शुभहस्ते बाळासाहेब शेंदुरकर लिखित “प्रात्यक्षिकातून प्रबोधन ” या पुस्तकाचे प्रकाशन होणार

22

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.18जुलै):-धानोरा येथील रहिवासी आदर्श शिक्षक तथा पै.बाळासाहेब शेंदुरकर शिक्षण क्षेत्रात पंचवीस वर्षांपासून अखंड सेवा करत आहेत.त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील अनुभवातून त्यांनी एक नवीन पुस्तक लिहिलेले आहे.त्या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल महोदयांच्या शुभहस्ते २१ जुलै रोजी राजभवन मुंबईत संपन्न होणार आहे. त्यांनी आजपर्यंत सहा पुस्तक लिहलेली आहेत,तेजवार्ता क्रीडा विषेश अंक व शेकडो क्रीडा विषयावर लेख लिहलेली आहेत.क्रीडा साहित्यिक व महाराष्ट्रात कुस्ती संघटक म्हणून कार्य करत आहेत.

राजा हरिश्चंद्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील उपक्रम आयोजित करतात.मा.श्री.भगतसिंह कोश्यारी साहेबांचा सन्मान करून त्यांना खेळाडूंच्या वतीने क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रातील मागण्यांबाबत निवेदन दिले जाईल .
” प्रात्यक्षिकातून प्रबोधन ” हे पुस्तक शालेय विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयोगी होणार आहे.जवळपास पुस्तकामध्ये प्रयोग,अनेक आध्यात्मिक उदाहरणे देऊन दृष्टांतसह मांडणी केलेली आहे अशी माहिती आमच्या प्रतिनिधी बरोबर संवाद करताना बाळासाहेब शेंदुरकर यांनी दिली.एटीएम ग्रुप चे प्रकाशन असणारे पुस्तक महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपाल महोदय यांच्या शुभहस्ते प्रकाशन होणार आहे.

या कार्यक्रमासाठी आष्टी तालुक्यातील मित्र,नातेवाईक व धानोरा,साबलखेड,परिसरातील ग्रामस्थ,खेळाडू,शिक्षक परिवारासह बी.टी,म्हस्के,माधव सावंत,अस्लम शेख,चंद्रकांत शिंदे,संदिप खराडे,सतिश सायंबर,सुनिल राठोड,भाऊसाहेब महाजन, सर,रमेश आढाव,देशमुख सर आदि शिक्षकांनी पुस्तक प्रकाशन सोहळ्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.