धरणगाव येथे राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने रॅली व बोंबाबोंब आंदोलन

26

🔹तहसिलदार मोहोळ साहेब यांना दिले निवेदन

✒️धरणगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

धरणगांव(दि.19जुलै):-दि.७ मे २०२१ च्या शासन निर्णयाच्या विरोधात राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ आयोजित चार चरणामध्ये आंदोलनाचा तिसरा टप्पा म्हणुन दि.१९ जुलै २०२१ रोजी संपुर्ण महाराष्ट्रासह धरणगांव येथे राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या मार्फत बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.यावेळी सर्वप्रथम कुळवाडीभूषण, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. महापुरुषांचा जयघोष करत रॅलीची सुरूवात करण्यात आली. पुढे उड्डाणपुल ते तहसील कार्यालयापर्यंत कर्मचारी व सहयोगी समविचारी संघटनांद्वारे रॅली प्रदर्षण करण्यात आले.

दि.७ मे २०२१ चा शासनादेश – रद्द करा, ओबीसींची जातीनिहाय जनगणना – झालीच पाहीजे, मराठा समाजाला संविधानिक आरक्षण – मिळालाच पाहिजे, मुस्लिम समाजाला आरक्षण – मिळालेच पाहिजे, शिक्षणाचे खाजगीकरण – रद्द करा, कर्मचार्यांची जुनी पेंशन योजना – चालु करा, कामगार विरोधी कायदे – रद्द करा, शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, नौकरभरती – चालु करा, प्रतिनिधित्व बचाओ-लोकतंत्र बचाओ,आरक्षण बचाओ-लोकतंत्र बचाओ… अश्या प्रकारच्या घोषणा रॅली मध्ये देण्यात आल्या. या रॅलीमध्ये शिवसेनेचे जळगाव लोकसभा सहसंपर्क प्रमुख मा.गुलाबरावजी वाघ साहेब यांची छत्रपती शिवरायांच्या स्मारकापासून ते तहसील कार्यालयापर्यंत विशेष उपस्थिती होती. त्यानंतर तहसील आवारामध्ये सरकारच्या देशविरोधी धोरणांच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले व सर्वांच्या वतीने मा.नायब तहसीलदार मोहोळ साहेब यांना निवेदन सादर करण्यात आले.

प्रोटाॅन शिक्षक संघटनेचे धरणगांव तालुकाध्यक्ष व राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ या ट्रेड युनियन चे अधिकृत पदाधिकारी मा.सुनिल देशमुख सर यांचे नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

प्रसंगी या आंदोलनांमध्ये भारत मुक्ती मोर्चाचे राज्य महासचिव मोहन शिंदे, बहुजन क्रांती मोर्चाचे तालुका संयोजक आबासाहेब राजेंद्र वाघ, छत्रपती क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील, बामसेफचे जिल्हा महासचिव हेमंत माळी, बामसेफचे तालुकाध्यक्ष पी.डी.पाटील, उपाध्यक्ष विलास कढरे, बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क चे तालुकाध्यक्ष निलेश पवार, राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष गोरख देशमुख, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे शहराध्यक्ष नगर मोमीन, तालुकाध्यक्ष सिराज कुरेशी, भारत मुक्ती मोर्चाचे तालुकाध्यक्ष गौतम गजरे, राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचे तालुकाध्यक्ष आकाश बिवाल, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष श्रीनाथ साळुंखे, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ जिल्हाध्यक्ष, तथा पत्रकार जितेंद्र महाजन, सुरज वाघरे, मयूर भामरे, नितीन गजरे, जहीर शेख, मो. मोईन, आशु सय्यद, मो.आदिल, मो.आफताब, मो.अहेमद, मो.दानिश, विक्रम पाटील, अमोल सोनार, विनोद चव्हाण, रवींद्र माळी, दिपक सोनवणे व इतर बहुजन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलिस उपनिरिक्षक मा. गुंजाळ साहेब यांचे पोलिस सहकार्यांच्या सहकार्याने व कोविड-१९च्या सर्व नियमांचे पालन करून हे आंदोलन यशस्वीरित्या संपन्न करण्यात आले.