सुभाष गायकवाड यांचा नागरी सत्कार…

24

✒️अशोक हाके(बिलोली प्रतिनिधी)मो.नं.9970631332

कुंडलवाडी(दि.19जुलै):- येथून तीन किमी अंतरावर असलेल्या मौजे ममदापुर येथील भूमिपुत्र सुभाष गायकवाड यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल समस्त गावकऱ्यांनी त्यांचा नागरी सत्कार दिनांक 19 रोजी केला आहे…..

बिलोली तालुक्यातील ममदापुर येथील रहिवाशी माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष गायकवाड हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक व राज्यकीय जीवनात काम करीत आहेत,त्यांनी गावच्या सरपंच पदापासून ते जिल्हा परिषद सदस्य पर्यंत आपला राज्यकीय प्रवास केला असून त्यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.तीनशेच्या आसपास लोकसंख्या असलेल्या छोट्याशा गावाचे नाव जिल्हास्तरावर पोहचवल्या बद्दल ममदापूर येथील सर्व ग्रामस्थांनी त्यांचा नागरी सत्कार करून त्यांचा गौरव केला आहे.

यावेळी या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष नागनाथ पाटील सावळीकर तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सरचिटणीस गोसोद्दीन खुरेशी,जिल्हा सरचिटणीस माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम हायगले,माजी सभापती व्यंकट पांडवे,तालुका कार्यध्यक्ष नागनाथ खेळगे,सामाजिक न्याय विभाग तालुका अध्यक्ष गंगाधर प्रचंड,माजी सभापती बाबाराव पाटील भाले,शहराध्यक्ष नरसिंग जिठ्ठावार,नगरसेवक अशोक कांबळे,बाबाराव पाटील साखरे,शेख बाशीद,आनंद गुडमुलवार,सादिक पटेल, शहर उपाध्यक्ष शेख ईशु,युवक शहराध्यक्ष अमरनाथ कांबळे,शंकरराव साखरे,नामदेव पाटील दौलापुरकर,गणपत पाटील दौलापूरकर,आदीसह ग्रामपंचायत सदस्य शंकर पाटील शिवशेट्टे,उमाकांत पाटील शिवशेट्टे,संतोष पाटील शिवशेट्टे,शिवा शिवशेट्टे,मारोती पाटील,नागनाथ मालीपाटील,शंकर पाटील,शिवलिंग पाटील,संगमनाथ शिवशेट्टे,संभाजी पाटील,ब्रह्मानंद शिवशेट्टे,झरीबा निदाने,सूर्यकांत पाटील शिवशेट्टे,प्रदीप घागळे,चंद्रकांत बुद्धिवंत,आदीसह मोठ्या प्रमाणात गावकरी,कार्यकर्ते उपस्थित होते……