देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त “अतिदक्षता सुविधायुक्त रुग्णवाहिकांचे लोकार्पण”

    40

    ?कोविड तिसऱ्या लाटेची भीती बाळगू नका – आ. सुरेश धस

    ✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

    आष्टी(दि.23जुलै):-माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस सोहळा पाच दिवस साजरा करण्यात येणार असून त्याअंतर्गत दोन सी-टाईप रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले असून नजीकच्याच काळात डी-दर्जाच्या उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्याला प्रत्येकी एक-एक देण्यात येणार आहेत.यापूर्वी अशा दर्जेदार रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे.

    तिसऱ्या लाटेची भीती बाळगू नका केवळ दक्षता घ्या दुसऱ्या लाटेमुळे अजूनही जनता भयभीत असून तणावाखाली असल्यामुळे आपण विविध उपक्रमाद्वारे” सेवाधर्म” भावनेतून माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे “बाहुबली” नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा वाढदिवस साजरा करत आहोत,गुणवंत विद्यार्थी गुणगौरव,कोविड योद्धा यांचा गौरव,सव्वा लाख वृक्ष लागवड,मॅरेथॉन सायकलिंग स्पर्धा यांच्यासह आष्टी,पाटोदा आणि शिरूर नगरपंचायत अंतर्गत प्रभाग निहाय मुले-मुली,महिला,ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.

    असे सांगत बीड,उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यातील प्रत्येकी ५०० बालरोग तज्ञ,वैद्यकीय अधिकारी आणि व्यावसायिकांची तीन दिवस ऑनलाईन कार्यशाळा आयोजीत करणार आहे.सर्व आरोग्य यंत्रणा सतर्क आहे.यापुढे त्रेधातिरपीट होणार नाही याचा दक्षता घेण्यात येणार आहे.पशुधन पर्यवेक्षकांच्या प्रश्नाबाबत आपण सर्वात अगोदर शासनाचे लक्ष वेधले आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचे दालनांमध्ये बसून केवळ बोगस पदवीधारकांविरुद्ध कारवाई होणार असल्याने संप मागे घेतला आहे.

    याबद्दल मंत्री केदार साहेबांचे आभार मानले असून शेतकऱ्यांचे लाळ्या खुरकूत रोगाने होणारे नुकसान टळले आहे.
    वाढदिवसानिमित घेतलेल्या शालेय व खुल्या मॕरेथाॕन आष्टी आणि कडा येथे झालेल्या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ सोहळा संपन्न झाला.आष्टी येथील मॕरेथाॕनमधील विजेते स्पर्धक प्रथम आलेला शिंदे रोहित जयमल्हार ११ हजार,द्वितीय पडोळे किरणला ७ हजार ,तृतीय जगदाळे अनिलला ४ हजार बक्षीस तर कडा येथील मॕरेथाॕन स्पर्धेत प्रथम रामदास बडेला ११ हजार,द्वितीय सोहेल पठाणला ७ हजार बक्षीस,तृतीय महाजन अंकुशला ४ हजार तर उतेजनार्थ १५ स्पर्धेकांना यावेळी बक्षीस आ.धस यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

    यावेळी जि.प.सदस्य प्रकाश कवठेकर,नगराध्यक्ष भारत मुरकुटे,उपनगराध्यक्ष सुनिल रेडेकर,माजी सभापती रमजान तांबोळी,सरपंच अनिल ढोबळे,वैद्यकीय अधिकारी डॉ.राहुल टेकाडे,डॉ.रामदास मोराळे,डॉ.घोडके,डॉ.मुंडे,नगरसेवक राजू जाधव,सुनील मेहेर,संतोष मेहेर,नितीन मेहेर,राहुल मुथ्था,किशोर झरेकर आदी उपस्थित होते.