अवैध दारू साठा व विक्री करणाऱ्यावर विशेष पथकाची कारवाई…

🔺लाखो रुपयांची दारू जप्त

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.23जुलै):- अवैध दारू विक्रीवर आळा घालण्यासंबंधाने ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनतर्फे विशेष मोहीम सुरू असून चंद्रपूर जिल्हयात दारूबंदी उठल्यानंतरही ब्रम्हपुरी परीसरात लपूनछपून अवैध दारू वाहतूक होत माहीती येत असल्याने पो.स्टे. ब्रम्हपुरी येथील विशेष पथकाद्वारे सतत छापा टाकून कारवाई करणे सुरू आहे. त्याच अनुषंगाने आज दि. २२/०७/२१ रोजी अं ११:०० वा दरम्यान विशेष पथकास गुप्त माहीतीदाराद्वारे खबर मिळाली की तोरगाव येथे दोन इसम हे पवनी सावरला मार्गावरून मोटरसायकलने अवैध दारू विक्री करीता घेवून येणार आहेत.

अशा माहीतीवरून तात्काळ तोरगाव येथे नाकाबंदी केली असता संशयीत दोन इसम नामे १) प्रकाश हरीजी प्रधान वय ३४ वर्ष २)रामु दशरथ अलोने वय ३८ वर्ष दोन्ही रा.मौशी ता नागभीड जि चंद्रपूर हे त्यांचे मोटरसायकलवर अवैध रित्या वाहतूक करताना मिळून आले. त्यांचे ताब्यातून प्रत्येकी १८० एम.एल च्या ४८ नग असलेले ०१ बॉक्स याप्रमाणे ऐकून ०३ बॉक्स की अं ११,५२० व त्यांनी दारू वाहतुकीकरीता वापरलेली जुनी वापरती हीरो स्प्लेंडर मोटरसायकल की. अं ३०,०००रू असा एकूण ४१.५२० रू चा मुद्येमाल जप्त करण्यात आला. नमूद आरोपीतांवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ अ.८३ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरची कारवाई मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मिलींद शिंदे, पोलीस निरीक्षक श्री रोशन यादव यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे सहा पोलीस निरीक्षक श्री. आशिष बोरकर यांचे नेतृत्वात पोलीस हवालदार नरेश रामटेके, नाईक पो. का. मुकेश गजबे, पो. का. प्रमोद प्रकाश चिकराम यांनी केली.

Breaking News, क्राईम खबर , महाराष्ट्र, विदर्भ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED