२० लाख रुपये खर्चून वाळकी गावात साकार होणार संत शिरोमणी सावता महाराज मंदिर

29

🔸आष्टी तालुक्यातील आदर्श शिक्षक अशोक लोखंडे यांचा स्तुत्य उपक्रम

✒️आष्टी प्रतिनिधी – सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.23जुलै):-वाळकी ता.अहमदनगर येथे स्वामी समर्थ संस्थान आसरा नगर येथे संत शिरोमणी सावता महाराज मंदिर उभारण्यात येणार आहे.दोन हजार स्केवेअर फूट बांधकाम करून भव्य सावता महाराज आणि विठ्ठल रखुमाई मंदिर उभारण्यात येणार आहे.अशी माहिती स्वामी समर्थ संस्थान आसरा नगर वाळकीचे व्यवस्थापकीय संचालक तथा बीड जिल्ह्यासह नगर जिल्हयात सामाजिक कार्यकर्ते म्हणून आपली वेगळी ओळख असणारे आदर्श शिक्षक अशोक (आबा )लोखंडे यांनी दिली.

संपूर्ण बांधकाम आरसीसी असून भव्य सभा मंडप उभारण्यात येणार आहे.या बांधकामासाठी २० लक्ष रुपये खर्च येणार आहे.सदर बांधकाम अशोक आबा लोखंडे हे स्वखर्चाने करणार आहेत.मंगळवार दि.२० जुलै रोजी आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर मंदिराचे भूमिपूजन समारंभ नगर तालुका शिक्षक समितीचे अध्यक्ष मधुकर मैड यांच्या हस्ते पार पडले.याप्रसंगी अशोकराव लोखंडे सरांचे पुज्य पिताश्री गुरुवर्य भागचंद लोखंडे गुरुजी,नगर तालुका शिक्षक समितीचे कार्याध्यक्ष निलेश तोडमल,भास्कर तापकीर,अनिल धाडगे,शहाजी भालसिंग,सुभाष बोठे,अमोल वाघ,जनार्दन मदने,मुन्नाशेठ उदावंत,रामा भालसिंग,आप्पासाहेब भालसिंग इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.आजवर आसरा प्रतिष्ठानच्या वतीने गरजूंना मदत,शिक्षक पुरस्कार,निराधार कुटुंबांसाठी घरकुलासाठी आर्थिक मदत,गरजू विद्यार्थ्यांना शालेयउपयोगी साहित्यांचे वाटप यासारखेअनेक समाजउपयोगी कार्यक्रम राबवण्यात आले आहे.अशी माहिती प्रतिष्ठानचे व्यवस्थापकीय संचालक आदर्श शिक्षक अशोक ( आबा ) लोखंडे यांनी दिली.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आणि आभार प्रदर्शन आसरा मेडीकल उद्योग समूहाचे प्रमुख आणि आसरा प्रतिष्ठानचे संचालक संदीप लोखंडे यांनी केले.