लोकतांत्रिक जनता दलाच्या कोषाध्यक्ष पदी रिजवान शेख यांची निवड

27

✒️नवनाथ आडे(बीड प्रतिनिधी)

बीड(दि.24जुलै):- शहरातील खासगी रुग्णालयाच्या क्षेत्रात सामान्य जनतेसाठी आधारस्तंभ असणारे सामान्य जनतेच्या सेवेसाठी 24 तास उपलब्ध असणारे बीड शहरातील तरुण समाजसेवक रिजवान उस्मान शेख यांची लोकतांत्रिक जनता दल च्या बीड शहर कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 

येथील लोकतांत्रिक जनता दलाच्या जिल्हा संपर्क कार्यालय येथे आज बीड जिल्हा अध्यक्ष सय्यद सलीम बापू यांच्या प्रमुख उपस्थितीत व युवक जिल्हाध्यक्ष पठाण अमरजान यांच्या नेतृत्वाखाली आज शहरातील तरुण समाजसेवक रिजवान उस्मान शेख यांची बीड शहर कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.यावेळी लोकतांत्रिक जनता दलाचे जिल्हा उपाध्यक्ष शेख अब्बास,शहराध्यक्ष शेख सलमान,शेख इलियास,एजाज इनामदार,शेख गुलाब यांनी रिजवान शेख यांच्या निवडीबद्दल शुभेच्छा देऊन पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या.