जगभरातील श्री गजानन महाराज केंद्रांवर गुरुपुजन सोहळा संपन्न

27

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.24जुलै):- एस बी एस गजानन महाराज सेवामामामार्गचे कोल्हापूर क्रांतिसिंह नाना पाटील येथील प्रधान केंद्र, तसेच गजानन महाराज गुरुपीठसह देशभरातील तसेच परदेशातील गजानन महाराज केंद्रांवर आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने कोरोनाच्या (Corona virus) सर्व नियमांचे काटेकोर पालन करत गुरुपुजन सोहळा अमाप उत्साहात व मंगलमय, भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. दरवर्षी प्रमाणे आषाढी एकादशी पासूनच या उत्सवास प्रारंभ झाला होता कोल्हापूर मध्ये प. पू. गुरुमाऊली सचिन सापळे(मामा) यांच्या उपस्थितीत आज पार पडलेल्या सोहळ्यात मोजक्याच सेवेकऱ्यांनी हजेरी लावली. दरवर्षी देशभर व परदेशात लाखो सेवेकरी या अत्यंत मंगलमय सोहळ्यात सहभागी होतात.

कोरोनाचे सावट असल्याने यावर्षी मोजक्याच सेवेकऱ्यांना जरी उपस्थित राहता आले तरी उत्साह, आनंद सर्वत्र ओसंडून वाहत होता. प्रमुख दरबार आणि गुरुपीठ येथे फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. सर्वांचाच आनंद द्विगुणित झाला.* कोल्हापूर क्रांतिसिंह नाना पाटील येथील प्रमुख सोहळ्यात जगभरातील लाखो सेवेकऱ्यांनी ऑनलाईन उपस्थिती लावली आणि गुरुपुजन करून दर्शन व आशीर्वाद प्राप्त केले. महत्त्वाचं म्हणजे सर्वांनी संपूर्ण मानवजातीवर आलेले कोरोनाचे सावट दूर व्हावे यासाठी सुध्दा सचिन सापळे (मामा) यांना विनंती केली.

*सेवेकऱ्यांची समर्थ चरणी प्रार्थना*
एस बी एस गजानन महाराज सेवामार्गांतर्गत गुरुमाऊली प. पू. सचिन सापळे (मामा) यांचे मार्गदर्शनाखाली जगभर हजारो केंद्र कार्यरत असून, या माध्यमातून लाखो महिला पुरुष सेवेकरी सक्रिय आहेत. या सर्वांच्या दृष्टीने आजच्या दिवसाचे खास महत्त्व असल्याने सर्वच जण या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात.

आज पहाटेच कोल्हापूर क्रांतिसिंह नाना पाटील येथे गुरुमाऊली प. पू. सचिन सापळे (मामा) यांनी गुरुपादुका पूजन तसेच श्री गजानन महाराज यांचे शोडशोपचार पूजन केले. सकाळी भूपाळी आरती व साडेदहा वाजता नैवद्य आरतीची सेवा रुजू करण्यात आली. उपस्थित मोजक्या सेवेकऱ्यांनी श्री गजानन महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करून चरण तीर्थ घेऊन मामांना विनंती केली की,” मामा आपणच माझे गुरू, माता, पिता, बंधू, सखा, गुरु, सदगुरू, परमगुरू, परात्पर गुरु व गुरुतत्व आहात माझा सांभाळ करा” महिला, पुरुष सेवेकऱ्यांनी आपापल्या घरी यानिमित्ताने श्री गजानन चरित्र, गुरुगीता या ग्रंथाची पारायणे व गण गण गणात बोते मंत्राचा जप केला.