कुंडलवाडी येथील बाजार समितीच्‍या आवारात अनोळखी इसमाचे प्रेत सापडले

25

✒️अशोक हाके(बिलोली,ता.प्र.)मो:-9970631332

बिलोली(दि.25जुलै):-तालुक्यातील कुंडलवाडी
येथील बाजार समितीच्‍या आवारात ६५ वर्षीय एका पुरुष जातीचे दिनांक २५/०७/२०२१ रोजी अनोळखी प्रेत सापडले असुन नागेश शंकरराव गोनेलवार यांच्या माहितीवरुन कुंडलवाडी पोलिस ठाण्‍यात आकस्मात मृत्‍युची नोंद झाली. कलम १७४ सी.आर.पी.सी.प्रमाणे करण्‍यात आली असल्‍याची माहिती येथील ठाण्‍याचे सपोनी सुरेश मान्टे यांनी दिली.

पोलिसांनी केलेल्‍या चौकशी दरम्‍यान सदर आनेाळखी इसमाकडे कसल्‍याच प्रकारचे पुरावा सापडले नसुन हा व्‍यक्‍ती अंदाजे आठ ते दहा वर्षापासुन कुंडलवाडी परिसरात भीक मागुन उदरनिर्वाह करीत असल्‍याची माहिती मिळाल्‍याचे सांगण्‍यात आले.
अनोळखी इसमाचे वर्णन उंची ५.६ रंग काळा,वय अंदाजे ६०,६५,पांढरे रंगाचे फुल शर्ट, धोतराची लूंगी कमरेला गुंडाळोले, केस काळे पांढरे,अशा प्रकारचे इसमाचे वर्णनाची माहिती स्‍थानिक पोलिसांनी दिली आहे.