खटाव तालुक्यातील गोसावी समाजातील भटक्या जमाती तील (एन टी) जातीचे दाखले तात्काळ उपलब्ध करून द्या; अन्यथा आंदोलन – गणेश भोसले

34

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मोबा.9075686100

खटाव(दि.25जुलै):-तालुक्यातील भटक्या जमाती गोसावी, बैरागी, नाथपंथी गोसावी, गिरी गोसावी, संन्यासी, रावळ, शिकलगार, बेलदार, वैधू वासुदेव, भाई, झिंगा भोई, परदेशी भोई, गारुडी, घिसाडी, गाडी लोहार, गोंधळी जोशी, बुडबुडकी जोशी,कुडमुडे जोशी, डमरूवाले जोशी, मेडगी, सरोदे, कोल्हाटी, डोंगरी नंदीवाले, धनगर, सनगर, वंजारी, ओतारी डवरी इ. समाजातील (एन टी) गोसावी गोसावी खटाव येथील समाजातील 60 ते 70 कुटुंबे आहेत. अशी तालुक्यातील हजारो कुटुंबे आहेत मोलमजुरी करून भंगार गोळा करून शेतमजुरी करून जगत आहेत. त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येत नाही.

तसेच मुलांना शिक्षण कामी घरकुल कामी नोकरी कामे जातीच्या दाखल्या अभावी काम होत नाहीत. या समाजातील लोक जुना 1965 पूरवा लागत आहे. त्यांचे वाडवडील पूर्वज फिरस्ती होते. त्यामुळे त्यांचा पुरावा सापडत नाही. तरी या समाजातील लोकांना तत्काळ जातीचे दाखले स्थानिक चौकशी तलाठी, सर्कल, ग्रामपंचायतीकडून करून देण्यात यावेत. अन्यथा येत्या आठ दिवसात या समाजातील सर्व लोकांना जमा करून आपल्या कार्यालयासमोर रिपाई (आठवले) गटाच्या च्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. निवेदन देताना रिपाईचे(आठवले) गटाचे खटाव ता कार्याध्यक्ष गणेश भोसले, युवा नेते सुनिल चव्हाण, संजय मोरे,अनिल मोरे, विलास जाधव, सयाजी आटोळे, मुन्ना मोरे, राम घाडगे, महेश जाधव उपस्थित होते.