प्राध्यापक भरतीबाबत सोमवारी अर्थमंत्रालयात निर्णय

39

🔹प्राध्यापक भरती लक्ष्यार्थ आंदोलन शिष्टमंडळाने घेतली अर्थमंत्र्याची घेतली भेट

✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पुणे(दि.२५जुलै):-राज्यातील अनुदानित महाविद्यालये व विद्यापीठातील प्राध्यापक भरती व इतर अनुषंगिक मागण्यासाठी आज प्राध्यापक भरती लक्ष्यार्थ आंदोलनच्या शिष्टमंडळाने पुणे येथील विधानभवनामध्ये उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली.शिष्टमंडळाने प्राध्यापक भरतीसाठी आमचे दिनांक १९ जुलै पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु आहे व याबाबतची फाईल आपल्या मंत्रालयाकडे अंतिम मंजुरीसाठी प्रलंबित असल्याचे अर्थमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिले व त्यास तात्काळ मंजुरी मिळावी अशी विनंती केली.

यावेळी उपमुख्यमंत्री म्हणाले, “माझ्याकडे असा कोणतीही निर्णय प्रलंबित नाही. सर्वच आवश्यक पदे भरण्यास मी मान्यता देत आहे. उच्च शिक्षणचा असा प्रस्ताव आला असेल तर सोमवारी प्रधान सचिव यांच्याकडून माहिती घेऊन प्राध्यापक भरतीबाबतचासुद्धा योग्य तो निर्णय घेतला जाईल.”यावेळी प्राध्यापक भरती लक्ष्यार्थ आंदोलनच्या शिष्टमंडळात डॉ. किशोर खिलारे, चारुशिला तासगावे, डॉ. संतोष भोसले, सौरभ पाटणकर यांचा समावेश होता.