देवस्थानाच्या ईनामी जमीनीची विल्हेवाट लावणाऱ्या तहसील प्रशासनाची सखोल चौकशी करा – सलीम बापू

27

✒️समाधान गायकवाड(विशेष प्रतिनिधी)

माजलगाव(दि.२५जुलै):-तालुक्यातील अनेक ठिकाणच्या इनामी व देवस्थानच्या जमिनी ची परस्पर विक्री करून विल्हेवाट लावणाऱ्या तहसील प्रशासन व त्यांना मदत करणाऱ्या इतर अधिकाऱ्यांच्या विरोधात लोकतांत्रिक जनता दलाच्या वतीने जिल्हा अध्यक्ष सलीम बापू च्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर दि २८ रोजी बे मुदत उपोषण करण्यात येनार आहे

या प्रकरणी लोकशाही मार्गाने मागण्याचे रीतसर निवेदन देऊनही कुठलीही कार्यवाही न झाल्याने दि २८ जुलै रोजी पासून बेमुदत उपोषन करणार असल्याचे लोकतांत्रिक जनता दलाचे जिल्हाध्यक्ष सलीम बापू यांनी म्हंटले आहे. विषयी दिलेल्या निवेदनात मा. जिल्हाधिकारी बीड यांचा परवाना नसतांना तसेच वक्फ बोर्ड चा परवाना नसतांना नित्रुड देवस्थानाची स.नं. ३६, ३७, ६६, ९७४, १७७, १७९, १८०, २११, २१२, ३६८, ३६९ एकूण क्षेत्र २२३ एकर जमीनीचा परस्पर फेरफार व विक्री व बोगस रजिस्ट्री केलेली असून सदर जमीनीवर मालकी रकान्यात इतर लोकांची नांवे लावण्यात आलेला आहे.

सदर झालेले सर्व फेरफार, बोगस रजिस्ट्री तात्काळ रद्द करुन संबंधीत सातबारावर मुळ देवस्थानाचे नाव लावून इतर लोकांची नांवे रद्द करुन सातबारा कोऱ्या करण्यात याव्यात, ऐतिहासिक देवस्थान माणिकशाह बाबांची दर्गा माजलगाव धरणाच्या निर्मिती वेळेस पाडण्यात आली व त्यांचे पवित्र साहित्य चिंचगव्हाण या ठिकाणी स.नं.८ मध्ये ठेवण्यात आले. परंतू माजलगाव तहसील कार्यालयाच्या मेहरबानीने या जमीनीवर अतिक्रमणे होवून या जमीनीची विल्हेवाट लावण्यात आली व याची मुळ संचिका चिंचगव्हाण ग्रामपंचायत, तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालय माजलगाव यांच्याकडे उपलब्ध असून रेकॉर्ड रुमचे अधिकारी कसलीही माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत. उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालय दोघे मिळून एकमेकावर लोटा-लोटीचे काम करुन व यांच्यामध्ये कसलेच ताळमेळ नसल्यामुळे या संबंधी वरिष्ठ अधिकाऱ्यांना खोटी व चुकीची माहिती देण्यात येत आहे.

या संबंधी आता अहवाल नको थेट निकाल देण्यात यावे, मौजे पात्रुड ता.माजलगाव येथील पेट्रोल पंप व स.नं. ९९/१ या जमीनी सुध्दा सातबारा कोरी करण्यात यावी. पेट्रोल पंप देवस्थानाच्या जागेत आहे. 1 ९३/१ हे कापन बोगस परवाना रद्द करण्यात आला,जिल्हा पुनर्वसन अधिकारी, कार्यकारी अभियंता वसाहत कालवा परभणी या सर्वांकडे मुळ संचिका असून सुध्दा मुळ संचिका दडवण्यात येत आहे.

देवस्थानाच्या ईनामी जमीनी संबंधी अनेक वेळा वारंवार आंदोलने करुन सुध्दा कसलीच कार्यवाही झालेली नाही. परिणामी देवस्थानाच्या ईनामी जमीनीची सर्रास पणे खरेदी-विक्री . बोगस रजिस्ट्री व फेरफार होत आहेत.तरी देवस्थानाच्या ईनामी जमीनी संबंधी आता अहवाल नको, निकाल देवून योग्य न्याय देण्यात यावा अन्यथा दि. २८/०७/२०२१ रोजी बेमुदत उपोषण करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे