माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित दोन-डी टाईप रुग्णवाहिकेचे आ.धस यांच्या हस्ते लोकार्पण

25

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.27जुलै):-भाजपाच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त विधान परिषदेचे आ.सुरेश धस यांनी आपल्या आमदार निधीतून उस्मानाबाद व लातूर या दोन जिल्ह्याच्या प्रमुख ग्रामीण रुग्णालयासाठी सर्व सुविधांनी युक्त अशा अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण केले.
दरवर्षी वेगवेगळ्या माध्यमातून आष्टी मतदारसंघात पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस विविध उपक्रमाद्वारे साजरा करण्यात येतो. गत दोन वर्षापूर्वी आष्टी – पाटोदा – शिरुर तालुक्यांमध्ये मोफत आरोग्य तपासणी, नेत्र शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले होते. या माध्यमातून नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर आरोग्य विषयक तपासणी करुन घेत उत्स्फुर्त प्रतिसाद दिला होता.

तर यावर्षी आ.सुरेश धस यांनी पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयासाठी सर्व सोयींनी युक्त अशा दोन डी-टाईप रुग्णवाहिकेंचे लोकार्पण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे केले.या रुग्णवाहिके मध्ये स्ट्रेचर, व्हील चेअर, आँक्सीजन सेवा मशीन, व्हेंटीलेटर मशीन, शुगर तपासणी, बी.पी.तपासणी, ताप मापक, गर्भातील बाळांची तपासणी यंत्र, बी.पी.मोजणी मशीन, आपत्कालीन सुविधा मशीन,प्रथोमोपचार किट, आँक्सीमिटर आदींची सुविधा उपलब्ध आहे.

यावेळी भाजपा उपाध्यक्ष संजय आजबे,माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे, नगराध्यक्ष भारत मुरकुटे, उपनगराध्यक्ष सुनील रेडेकर, मोहन झांबरे, आत्माराम फुंदे, मच्छिंद्र धनवडे, सुनील मेहेर, जिया बेग, पत्रकार उत्तम बोडखे, विनोद रोडे, नगरसेवक किशोर झरेकर, दीपक निकाळजे, सरपंच अतुल कोठुळे,सरपंच प्रविण फुंदे, उपसरपंच सागर धोंडे,नितीन मेहेर, राहुल मुथ्था, सचिन लोखंडे,शफी सय्यद, असफाक आत्तार, विजय
धोंडे, प्रीतम बोगावत, पत्रकार शरद रेडेकर, गणेश दळवी,सचिन रानडे,प्रविण पोकळे आदी उपस्थित होते.