येवला तालुक्यातील सायगांव ग्रा. पं. प्रशासनाच्या मनमानी गैर कारभारा विरोधात ग्रा. पं. सदस्याचे आमरण उपोषण लेखी आश्वासनानंतर स्थगित

    37

    ✒️नाशिक,जिल्हा प्रतशांताराम दुनबळे

    नाशिक(दि.27जुलै):-येवला तालुक्यातील सायगाव येथील ग्रामपंचायतीचा अधिकार्‍यांच्या मनमानी व गैर कारभाराविरोधात सोमवार दिनांक २६/७/२०२१ रोजी सकाळी ११वाजता पंचायत समिती कार्यालय येवला येथे ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब अहिरे,अरविंद उशीर ,योगिता निघुट हे आमरण उपोषणाला खालील मागण्या मान्य करण्यासाठी बसले होते.

    १)ग्रामपंचायत सदस्य यांच्या मासिक मिटिंग मध्ये चर्चा झालेल्या विषया वर विरोधी सदस्यांनी आक्षेप व हरकत घेतली असता त्याची प्रोसेडिंग ला नोंद घेण्यात यावी.
    २)    ग्रा.पं मासिक मीटिंग माहे दिनांक २६/४/२०२१ चा विषय भावपत्रके (कोटेशन)मंजुरीचे आधिकर सरपंच यांना प्रदान करणे बाबतचा ठराव रद्द करण्यात येऊन पूर्वी प्रमाणे सदरचे कोटेशन हे मासिक मिटिंग मध्ये मंजूर करावे.
    ३)     ढाकणे वस्ती व निघुट वस्ती येथील पाईपलाईन ची सखोल चौकशी करण्यात येऊन दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
    ४) ग्रामपंचायतने  १५ व्या वित्त आयोगातून स्ट्रेट लाईटचे बिले न भरणे बाबत ठराव मंजूर करावा.
    ५)     गावातील नादुरुस्त असलेले  सौरदिप चालू करण्यात यावे.
    ६)     ग्रा.पं मासिक मिटिंग संपल्यानंतर  प्रोसेडिंगची प्रत सदस्यांना  त्याच दिवशी देण्यात यावी.
    ७)ग्रामपंचायत कार्यालयात थंब मशीन व cctv तसेच गावात मुख्य ठिकाणी  cctv बसविण्यात यावे.प्रमुख मागण्या घेऊन उपोषण करण्यात आले. होते सदर उपोषणाची व
    सदरच्या मागण्याचा विचार करून येवला पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आनंद यादव यांनी १५ दिवसांत सखोल चौकशी करू असे लेखी पत्र दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले.

    सदर मागण्यांची सखोल चौकशी होऊन अहवाल न मिळाल्यास पूढील उपोषण हे लोकशाही मार्गाने १३ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद नाशिक येथे करण्यात येईल असा इशारा उपोषण कर्ते भाऊसाहेब अहिरे,योगिता निघुट,अरविंद उशीर यांनी सांगितले.