बौद्ध स्मशानभूमीतील बोर त्वरित सुरू करा- भीम टायगर सेने ची मागणी

    62

    ?न.प मुख्याधिकारी यांना निवेदन सादर

    ✒️सिध्दार्थ ओमप्रकाश दिवेकर(तालुका प्रतिनिधी उमरखेड)मो:-9823995466

    उमरखेड(दि.28जुलै):-शहरातील एकमेव बौद्ध धर्मियांचे अंतसंस्कार पवित्र ठिकाण म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर वार्ड मधील बौद्ध स्मशनभूमीतील बोर हा बंद अवस्थेत आहे.

    मागील एक महिन्यापासून सर्व्हिस केबल जाळल्यामुळे बोर बंद पडला आहे .”नगरपालिकेच्या संबंधित कर्मचाऱ्यांना व वार्ड च्या नगरसेवकांना वारंवार सांगूनही आजपर्यंत बोरचे काम करण्यात आले”.

    बौद्ध स्मशानभूमीतील बोर त्वरित सुरू करा अशी मागणी सिध्दार्थ दिवेकर (अध्यक्ष बौद्ध स्मशानभूमी संवर्धन समिती तथा शहराध्यक्ष भीम टायगर सेना उमरखेड) यांनी केली आहे.
    यावेळी प्रफुल दिवेकर, विजय दिवेकर, नितीन आठवले, बुद्धभूषण इंगोले इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.